koffee with karan: सिद्धार्थ अन् कियारा घेणार सात फेरे? केला शोमध्ये खुलासा

'कॉफी विथ करण'च्या पुढच्या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विकी कौशल दिसून येणार आहेत.
Koffee With Karan Season 7
Koffee With Karan Season 7Dainik Gomantak

प्रसिद्ध सेलिब्रिटी चॅट शो 'कॉफी विथ करण'चा (koffee with karan) आता सातवा सीझन चालू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, समंथा रुथ प्रभूपासून ते अनन्या पांडे, विजय देवरकोंडापर्यंत अनेक स्टार्स येऊन गेले आहेत. हा शो त्याच्या जबरदस्त कंटेंटमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो आणि या शोमध्ये करण जोहर अनेकवेळा सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गुपिते उघडताना आपल्याला दिसून येतो. शोच्या पुढच्या भागामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि विकी कौशल (Vicky Kaushal) दिसून येणार आहेत. शोचा प्रोमोही समोर आला आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. (Siddharth Malhotra and Vicky Kaushal will be seen in the next show of Koffee With Karan)

Koffee With Karan Season 7
Photo: करिनाने सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास फोटो

कॉफी विथ करण 7 च्या पुढील भागाचा प्रोमो करण जोहरने (Karan Johar) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे ज्यामध्ये फिल्ममेकर विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत जबरदस्त मस्तीच्या फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. दरम्यान, करण सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या नात्याचे रहस्यही उघड करताना दिसू शकतो.

प्रोमोच्या सुरुवातीला करण जोहर म्हणतो की, 'आज शोमध्ये दोन पंजाबी मुंडे आमच्यासोबत एकत्र दिसून येणार आहेत.' यावर विकी म्हणतो- 'हा कॉफी विथ करणचा पंजाबी एपिसोड असणार आहे.' समोर आलेल्या व्हिडिओमध्ये करण सिद्धार्थ आणि कियारा यांच्या डेटींगबद्दल बोलताना देखील दिसून येत आहे. एवढेच नाही तर त्याने अभिनेत्याला त्याच्या लग्नाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

येथे सिद्धार्थने कियारा अडवाणीला डेट केल्याचेही मान्य केले आहे. होस्ट करण जोहरने सिद्धार्थला विचारले की, 'आता तू कियारा अडवाणीला डेट करत आहेस, तिच्यासोबत लग्न करण्याचा तुझा काय विचार आहे?' प्रत्युत्तरात सिद्धार्थ म्हणतो- 'मी ते मेनिफेस्टिंग करत आहे.' यावर करण सिद्धार्थला उत्तर देण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहे तर तो विचारतो- 'कियाराशी लग्न करणार का?'

Koffee With Karan Season 7
Photo: करिनाने सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास फोटो

यावर सिद्धार्थ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो आणि म्हणतो- 'सॉरी.' सिद्धार्थच्या उत्तरावर करण म्हणतो की, 'ये बड़ा बिब्बा मुंडा है'. हे ऐकून तिघेही जोरजोरात हसायला लागतात. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी एकमेकांना डेट करत असल्याचे करणच्या प्रश्नावरून आता स्पष्ट झाले आहे मात्र, लग्नाचा प्रश्न तो टाळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com