Siddharth Malhotra Viral Video :'RRR' आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स'वर प्रश्न विचारताच असा का रिअ‍ॅक्ट झाला सिद्धार्थ ?

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे
Siddharth Malhotra
Siddharth Malhotra Dainik Gomantak

Siddharth Malhotra Viral Video: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी काही दिवसांपूर्वी सतत चर्चेत राहिले. आता सिद्धार्थ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता विमानतळावर एका व्हिडीओमुळे एका बाजुला सिद्धार्थ ट्रोल होतोय तर दुसऱ्या बाजूला त्याचे फॅन्स त्याची पाठराखण करतायत.

 यापूर्वी सिद्धार्थ अभिनेत्री कियारा अडवाणीसोबतच्या लग्नामुळे खूप चर्चेत होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर, सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा त्यांच्या कामात पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.

 नुकतेच सिद्धार्थने विमानतळावर 'RRR' बद्दल असे काही सांगितले, ज्यानंतर यूजर्स त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. यादरम्यान त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत सिद्धार्थला एक प्रश्न विचारण्यात आला पण त्याच्या बॉडी लॅंग्वेजमधुन तो या प्रश्नासाठी अजिबात उत्सुक नसल्याचंच दिसलं.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याचा आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'योद्धा'चे शूटिंग सोमवारी पूर्ण केले. तर, सिद्धार्थ नुकताच विमानतळावर स्पॉट झाला. यादरम्यान पापाराझींनी सिद्धार्थला 'आरआरआर' आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रश्न केला.

Siddharth Malhotra
Oscar Award 2023: RRR ने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्काराचा प्रश्न ऐकल्यावर सिद्धार्थ टाळाटाळ करताना दिसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेता घाईघाईने निघताना दिसत आहे. पापाराझींनी त्याला प्रश्न करताच तो अत्यंत रागात म्हणतो, 'ही काय पत्रकार परिषद चालली आहे का?.' 

सिद्धार्थच्या या वागण्यावर चाहते प्रचंड संतापलेले दिसत आहेत. यावर कमेंट करून त्यांना ट्रोल केले जात आहे. अनेकजण सिद्धार्थला ट्रोल करत असतानाच अनेकजण त्याचा बचाव करतानाही दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com