सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सिध्दार्थ पिठानीला अटक

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आता NCB ने त्याचा मित्र असणाऱ्या सिध्दार्थ पिठानीला (Sidharth Pithani) अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून (Hyderabad) ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच त्याला मुंबईत (Mumbai) आणणार असल्याची माहिती मिळत आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिध्दार्थला पिठानीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला कोणतं नव वळण लागणार असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. NCB सह या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती(Ria Chakraborty) हिलाही अटक करण्यात आली होती.  शौविक चक्रवर्तीच्या मदतीने सुशांतला ड्रग्ज पुरावल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती. अनेक दिग्गज सेलिब्रिटींना या प्रकरणात तपासाला सामोरं जावं लागलं होतं. (Siddharth Pithani arrested in Sushant Singh Rajput case)

किम कार्दशियन नव्या वादाच्या भोवऱ्यात; हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण आहे ते अद्याप समजलेलं नाही. मात्र नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून सुशांत घराघरात पोहचला होता. त्यानंतर त्याने हिंदी सिनेसृष्टीत 'पी.के' 'शुध्द देसी रोमान्स' 'छिछोरे' अशा सिनेमामध्ये सुशांतने काम केलं होतं. त्याच्या आत्महत्यमुळे सिनेसृष्टी पुरती हादरली आहे.   

संबंधित बातम्या