Siddharth Shukla: सिद्धार्थच्या आठवणीत Twitter हळहळल!

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Siddharth Shukla: सिद्धार्थच्या आठवणीत Twitter हळहळल!
Siddharth Shukla demise: Netizens still in shockDainik Gomantak

बहुचर्चित टीव्ही आणि चित्रपट अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla),जोअनेक काळ चालणाऱ्या टीव्ही शो "बालिका वधू" मधील त्याच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर बिग बॉसच्या (Big Boss) 13 वे सीजन आपल्या अनोख्या गेमने गाजवत ज्याने हा खिताब आपल्या नावावर केला होता मात्र आज जीवनाच्या पटलावर तो हरला आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. (Siddharth Shukla demise: Netizens still in shock)

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या कमी वयामध्ये या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

सिद्धार्थ शुक्लाचे चाहतेही अनेक आहेत आणि त्याचे चाहते आपले दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करता आहेत. ट्विटरवर तर त्याच्या चाहत्यानीं दुःख व्यक्त करताना सिद्धार्थच्या आठवणींचा पाऊसच पाडला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com