Sidharth Shukla: सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांकडे सादर करण्यात आला

आज दुपारी 1 वाजे पर्यंत मुंबई येथील ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Sidharth Shukla: सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांकडे सादर करण्यात आला
Sidharth ShuklaDainik Gomantak

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाची (forensic Report) प्रत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आली असून, आज हा अहवाल आपल्या सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे. हा अहवाल ओशिवरा पोलिसांच्या तपास अधिकाऱ्याला सादर करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आज (Today) या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करू शकतात.

Sidharth Shukla
Sidharth Shukla: आता मी कसं जगू? सिद्धार्थच्या अचानक जण्याने शहनाज गिलला दुःख अनावर

सिद्धार्थ शुक्लाच्या अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षी जण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय टीव्ही आणि चित्रपट होता. फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ आर सुखदेवे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये मृत आणण्यात आले होते. रात्री उशिरा पर्यंत सिद्धार्थ शुक्ला यांचे शवविच्छेदन चालू होते, या नंतर कुटुंबाच्या ताब्यात बॉडी देण्यात आली असून, अद्याप शवविच्छेदनअहवालाबाबत पोलिसांनी अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.

Sidharth Shukla
सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यूच्या एक दिवस आगोदर 'या' अभिनेत्यासोबत झाल होता कॉल

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खूणा आढळून आल्या नाहीत, तसेच त्यांच्या मृत्यूबाबत शंकास्पद असे काहीही समोर आले नाही. प्रथमदर्शी त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे समजते आहे. परंतु मृत्यू मागचे खरे कारण आजच्या अहवलातून समोर येईल. सिद्धार्थ शुक्ला यांचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला असून आज दुपारी 1 वाजे पर्यंत मुंबई येथील ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com