कुठे आणि का उभारण्यात आले 'सोनू सूद'चे मंदिर? वाचा..

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

तेलंगणा राज्याच्या सिद्धीपेट भागातील लोकांनी एखाद्या देवी देवत्याचे नव्हे तर थेट सोनू सूदचेच मंदिर उभारले आहे. लॉकडाउनच्या काळात  अनेक स्थलांतरितांच्या केलेल्या मदतीमुळे त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी स्थानिकांनी त्याचे मंदिर उभारले आहे

 हैदराबाद- तेलंगणा राज्याच्या सिद्धीपेट भागातील लोकांनी एखाद्या देवी देवत्याचे नव्हे तर थेट सोनू सूदचेच मंदिर उभारले आहे. लॉकडाउनच्या काळात  अनेक स्थलांतरितांच्या केलेल्या मदतीमुळे त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी स्थानिकांनी त्याचे मंदिर उभारले आहे.  

 मंदिरात रोज होणार पूजा-अर्चना 
या मंदिराच्य उभारणीनंतर तेथील लोकांनी दररोज नित्यनेमाने या मंदिरात सोनू सूदची पूजा करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात सोनूने अक्षरश: जीवाचे रान करत स्थलांतरितांसाठी काम केले होते. त्यावेळी त्याने भारतभरातील अनेक कोपऱ्यांत अडकलेल्या गरीबांना मदत करत त्यांना घरी पोहचवले होते. त्याच्या या कार्यामुळे त्याच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करत  सिद्धीपेटमधील लोकांनी थेट त्याचे मंदिरच उभारले.  

गावकऱ्यांची आता एकच मागणी..
लोकांच्या मतानुसार गावात अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. प्रामुख्याने गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने सोनू सूदने गावाला भेट देऊन या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी आकांक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली.  प्रशासनाने दुर्लक्ष केलेल्या या भागात आता सोनू सूदनेच येऊन काहीतरी करावे असे त्या लोकांचे म्हणणे  आहे. सोनूकडून अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणावर मात्र, बोट ठेवले आहे. 

दरम्यान, प्रतिभावान अभिनेता असलेल्या  सोनू सूदला यंदाचा प्रथम क्रमांकाचा आशियाई सेलिब्रिटी म्हणून घोषित करण्यात आले असून त्याल इस्टर्न आय या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या ५० आशियाई सेलिब्रिटींमध्ये सोनूने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.  

संबंधित बातम्या