ओबांमाच्या 'फेवरेस्ट लिस्ट'मध्ये जयपूरचा प्रतीक आला अन् अचानक स्टार झाला...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

एक दिवस घरात एकटे बसलेले असताना त्यांच्या फोनवर अचानक शेकडो संदेश आले. अनेक फोन  येण्यास सुरूवात झाली. त्यांना काही समजण्याच्या आतच ते स्टार झाले होते. त्यांना फोनवर येणाऱ्या संदेशांमध्ये 'तु पाहिलेस का, ही खूप मोठी गोष्ट आहे.' असा उल्लेख होता.

नवी दिल्ली- आयुष्यात बऱ्याच गोष्टी अगदी नकळत घडत असतात. आपण आपले काम करत असतो आणि अचानक एखादी गोष्ट अशी घडून जाते की, आपल्याला मातीतून आकाशात घेऊन जाते. असेच काही दिल्लीचे गायक प्रतीक कुहाड यांच्याबरोबर घडले आहे. एक दिवस घरात एकटे बसलेले असताना त्यांच्या फोनवर अचानक शेकडो संदेश आले. अनेक फोन  येण्यास सुरूवात झाली. त्यांना काही समजण्याच्या आतच ते स्टार झाले होते. त्यांना फोनवर येणाऱ्या संदेशांमध्ये 'तु पाहिलेस का, ही खूप मोठी गोष्ट आहे.' असा उल्लेख होता. त्यानंतर थोड्या वेळात त्यांना समजत गेले की त्यांचं एक गाणं बराक ओबामांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत आले आहे.

गायक प्रतीक कुहाड हे मुळचे जयपूर येथील असून त्यांनी गायलेलं गाणं 'कोल्ड मेस' हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडत्या ३५ गाण्यांच्या लिस्टमध्ये आल्याने याची सर्वत्र चर्चा होण्यास सुरूवात झाली. अमेरिकेच्या चार्टसबीट्समध्ये सुद्धा न आलेलं हे गाणं थेट ओबामांच्या 'फेवरेट लिस्ट'मध्येच आलं.

या यादीत ब्रूस स्प्रिंग्सटीन, दबेबी, लिजो आणि बियोंसे यांचे गाणेही सामील आहेत. हे गाणं बराक यांच्यापर्यंत काहीही कल्पना नसल्याचं कुहाड सांगतात. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होऊन त्यांचे करिअर सेट होण्यास मदत झाली. ही एक अजब गोष्ट असून अचानक झाली असल्याचे ते म्हणाले. 

संबंधित बातम्या