पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती चिंताजनक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बालसुब्रह्मण्यम हे जीवरक्षक प्रणालीवर असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून आहे.

चेन्नई: कोरोना संसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (वय ७४) यांची प्रकृती खालावली आहे. ते येथील एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात पाच ऑगस्टपासून उपचार घेत आहेत.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बालसुब्रह्मण्यम हे जीवरक्षक प्रणालीवर असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून आहे. बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांच्या मुलाने चारच दिवसांपूर्वी जाहीर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता मात्र ते पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या