चाहते अजुनही तीचेच गीत गात आहे....

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

स्मिता पाटील यांच्या निधनाला अनेक वर्ष उलटली, पण चाहते अजुनही तीचेच गीत गीत आहे.

अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज स्मृतिदिन. आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या. वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. स्मिता पाटील यांच्या निधनाला अनेक वर्ष उलटली, पण चाहते अजुनही तीचेच गीत गीत आहे.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर नेहमीच आपल्या आईबद्दल सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. 13 डिसेंबर रोजी स्मिता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रितीकने सोशल मीडियावर आईसाठी अत्यंत भावनिक अस पत्र पोस्ट केलं आहे, जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडल आहे .

एकेकाळी बॉलिवूडची सर्वात हुशार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील 34 वर्षांपूर्वी वयाच्या 31 व्या वर्षी जग सोडून गेल्या.  प्रितीकने लिहिले की, "माझ्या आईने 34 वर्षांपूर्वी या दिवशी आम्हाला सोडले आहे ... एवढ्या वर्षांत मी माझ्या मनात तिचे काल्पनिक असे एक परिपूर्ण चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे.  आता ती एक परिपूर्ण आई आहे ... एक परिपूर्ण स्त्री ... एक उत्तम आदर्श आहे ... प्रत्येक लहान मुलासाठी ती सुंदर आहे ... एक परिपूर्ण आई जी प्रत्येक लहान मुलाचा विचार करते आणि जीच्याबद्दल प्रत्येक लहान मुल आई अशी असावी असे इच्छित असतो. अशी आई जी तुला कधीच एकटे सोडत नाही आणि नेहमीच ती तुमच्यासोबत राहते. प्रितीकने पुढे लिहिले की,  'माझी आई दरवर्षी माझ्याबरोबर तरुण होत आहे ... आता ती 65 वर्षांची सुदर तरूणी आहे ... ती माझ्या मनामध्ये कायम जिवंत असणार आहे माझ्यासोबत जगणार आहे. माझी सुंदर आई माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. ती माझासाठी सुपर लेजेंड आहे.”

स्मिता पाटील यांनी 10 वर्षांच्या अल्पावधी कारकिर्दीत 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. उत्कृष्ट अभिनयासाठी 2 राष्ट्रीय पुरस्कार व इतर पुरस्कारही त्यांनी जिंकले. स्मिता पाटील यांच्या मृत्यूच्या एक वर्षापूर्वी 1985 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते.

 

संबंधित बातम्या