म्हणून इफ्फी हवी!
52 IFFI2021Dainik Gomantak

म्हणून इफ्फी हवी!

इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांत आपल्याला जे आवडतं ते शोधण्यापेक्षा, आपल्याला काय मिळू शकतं, आपल्याला कशाची जाणिव नाही, त्याचा शोध घेणं महत्वाचे आहे.

कुठलीही कला ही फक्त माहितीची वाहक नसते, किंबहुना नसावी. कला ही समान किंवा वेगवेगळ्या कालखंडातील आणि अथवा भुखंडातील दोन लोकांना जोडणारा भावनिक पूल असते. अस नसतं तर बेथोवीनची दोनशे वर्षांपुर्वींची कंपोजिशन्स आपल्याला आजही भावूक का करती? पिकासोचा ‘गर्नीका’ आपल्याला आजही युद्धाबद्दलच्या संतापाचा, भयावहतेचा प्रत्यय का देऊ शकतो? याचाच अर्थ, आज जेव्हा कुणी कलाकार, कुठलीही कला सादर करतो त्यावेळी त्याची ही जबाबदारी असते की त्याने आपल्या अनुभवांना, भावनांना आपल्या कलेद्वारे व्यवस्थीत, निर्दोषरित्या मांडणे. ही मांडणी तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपल्या कलामाध्यमाची भाषा आपण उत्तम प्रकारे जाणू. सिनेमा माध्यमाचा विचार केल्यास, गोव्यांत 2004 पासून ही भाषा शिकण्याची संधी आम्हा सर्वांकडे इफ्फीच्या रुपाने आली.

52 IFFI2021
IFFI 2021: ‘सेमखोर’ या चित्रपटाने होणार उद्घाटन

इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांत आपल्याला जे आवडतं ते शोधण्यापेक्षा, आपल्याला काय मिळू शकतं, आपल्याला कशाची जाणिव नाही, त्याचा शोध घेणं महत्वाचे आहे. आपल्याला जे आवडतं ते देण्यासाठी दर शुक्रवार सज्ज असतो. निदान इफ्फीत आम्ही आम्हाला जे माहीत नाही, ज्याची आम्हाला जाणिव नाही त्याचा शोध घेऊया. आपल्या भावनंचं अचूक चित्रण करण्यासाठी आपल्याकडे पाहीजेत सिनेमेटीक टूल्स. एकदा का आमच्या हाती हे टूल्स लागले की मग दुसरी पायरी असते आपलं कौशल्य वाढविण्याची. कौशल्य वाढवणं म्हणजे फिल्म मेकींगसंबंधीचे प्रत्यक्ष, व्यावहारीक ज्ञान प्राप्त करणे. इथे मात्र प्रश्न येतो पैशांचा. सिनेमा हा कला प्रकार तसा खूपच महागडा. परंतू नवीन तंत्रज्ञानाने सिनेमा मेकिंग टूल्स आपल्या खिशांत आणून ठेवले आहेत. सिनेमाच्या संदर्भांत, आम्हाला मोबाइलच्या क्षमतेची जाणीव होणेही गरजेचं आहे. झिरो बजेट फिल्म बनवण्यासाठी माझ्याकडे अजून एक कल्पना आहे- क्राऊड सोर्सिंग. वेगवेगळी कौशल्ये असलेल्या आठ दहा लोकांनी एकत्र यावं. यातील प्रत्येकानं एक फिल्म करावी, इतरांनी त्याला मदत करावी, आर्थीक नव्हे, तर आपापल्या प्रतिभेने. नंतर दुसऱ्यांने फिल्म करावी, बाकिच्यांनी त्याला मदत करावी. म्हणजे एकंदरीत आठ दहा फिल्मस तयार होतील. त्यात प्रत्येकाची एक फिल्म असेल आणि आठ दहा फिल्ममध्ये प्रत्येकाला क्रेडीट मिळेल. एक प्रयोग म्हणून आपण हे करू शकतो.

52 IFFI2021
IFFI 2021: इंडियन पॅनोरमामध्ये 24 पैकी एका तेलगू चित्रपटांची निवड

परंतू त्यासाठी आपल्याकडे सिनेमाच्या भाषेवर, व्याकरणावर पकड पाहीजे. सिनेमाच्या भाषेची जाणीव आपल्याला इफ्फीसारख्या चित्रपट महोत्सवातून होऊ शकते. कारण अशा महोत्सवात फक्त सिनेमेच नसतात तर सिनेमा क्षेत्रांतील जाणकारही असतात. त्यांच्या अऩुभवांचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्याना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे तिथे शक्य असते ‘आणि... डॉ काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील एका संवादाची मला आठवण झाली. “टाळी हा सरस्वतीने माणसाला दिलेला सर्वात मोठा शाप आहे”. मग वरदान काय? आपली टूल्स, आपली संवेदनशिलता. ती अजून धारधार करुया. अन् ती धारधार करण्यासाठी इफ्फी आहेच- एखाद्या सहाणेसारखी!

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com