‘मनी हाईट्स’ मधील ‘Bella Ciao’ च्या मराठी व्हर्जनमधून दिला जातोय सामाजिक संदेश 

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

‘मनी हाईट्स’ ही वेबसिरीज प्रक्षेकांच्या चांगलीच पसंतीला उतरली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Corona Second Wave) मागील वर्षी करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) कोणीच विसरु शकत नाही. अनेकांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तिंना गमावलं. तर दुसरीकडे माणुसकीचे दर्शनही घडले. या कोरोना काळात अनेकांनी माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला. तसेच वर्क फ्रॉम असल्यामुळे या काळात प्रक्षेकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी अनेक सिनेमे, वेबसिरीज आल्या. त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक वेबसिरीजपैकी एक ‘मनी हाईट्स’ (Money Heist) ही वेबसिरीज प्रक्षेकांच्या चांगलीच पसंतीला उतरली. या वेबसिरीजमधील ‘Bella Ciao’  हे गाणं सुध्दा खूप लोकप्रिय झालं. (Social message is given from the Marathi version of Bella Ciao in Money Heights)

जुनी आठवण शेयर करत रवीना टंडन म्हणाली;  हे खूप आधीच मिळायला हवं होतं.. 

नव्या वर्षात सगळी परिस्थिती सुरुळीतपणे सुरु होईल अशी आशा सामान्य नागरिकांनी ठेवली होती. परंतु सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थीती निर्माण झाली. आता कोरोनाची आलेली दुसरी लाट महाभयंकर आहे. हे आपण सर्वजण पाहतच आहे. असं असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. लोकांना त्यांच्याच भाषेत त्यांच्या पध्दतीनेच समजावून सांगण्यासाठी कडक एंटरटेनमेंट घेऊन आलं आहे ‘Bella Ciao’ चं कडक मराठी व्हर्जन.’

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या अहमदनगर फिल्म कंपनीची निर्मिती असलेलं Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन ‘कसा ला’ गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि अक्षय मुनोत यांची आहे. या गाण्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
 

संबंधित बातम्या