सोहेल खान अन् सीमा खान लग्नाच्या 24 वर्षांनंतर केला घटस्फोटासाठी अर्ज

बॉलीवुड अभिनेता सोहेल खान आणि सीमा खान यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
सोहेल खान अन् सीमा खान लग्नाच्या 24 वर्षांनंतर 
केला घटस्फोटासाठी अर्ज
Sohail Khan and Seema Sachdev KhanDainik Gomantak

बॉलीवुड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा खान (Seema Sachdev Khan) यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या जोडप्याच्या लग्नाला 24 वर्षे झाली असून त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुले आहेत. सलमान खानचा (Salman Khan) धाकटा भाऊ सोहेल आणि 'द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज'मध्ये दिसणारी सीमा शुक्रवारी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना माध्यामांना दिसून आली आहे. (Sohail Khan and Seema Khan after 24 years of marriage Application for divorce)

Sohail Khan and Seema Sachdev Khan
Chakda Xpress: 'चकदा एक्सप्रेस' साठी भर उन्हात मेहनत घेतेय अनुष्का शर्मा

फोटोंमध्ये सीमा आणि सोहेल कोर्टातून बाहेर पडताना दिसून आले तर त्यांनी तेथे उपस्थित माध्यमांपासून अंतर राखताना देखील दिसून आले आहेत. सोहेल आणि सीमा यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

कौटुंबिक न्यायालयात उपस्थित असलेल्या एका सूत्राने माध्यमांना सांगितले की, “सोहेल खान आणि सीमा सचदेव आज न्यायालयात हजर होते तर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघेही एकमेकांशी मैत्रीपूर्ण असल्याचे देखील दिसून आले आहे." घटस्फोटाच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते न्यायाधीश मकदूम यांच्यासमोर हजर झाले होते.

सीमाने 'द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज' वर खुलासा केल्यावर त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली की ते वेगळे होणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेबद्दल बोलताना सीमा म्हणाली की, “सोहेल आणि मी पारंपारिक विवाह नाही तर आम्ही एक कुटुंबच आहोत, आम्ही एक युनिट आहोत. आमच्यासाठी, तो आणि मी आणि आमची मुले दिवसाच्या शेवटी महत्त्वाचीच आहेत."

Sohail Khan and Seema Sachdev Khan
कतरिना कैफ 2 महिन्यांची गर्भवती? काय आहे सत्य!

ती पुढे म्हणाली की, “कधी कधी तुम्ही मोठे होतात तेव्हा तुमचे नातेसंबंध बिघडतात आणि वेगळ्या दिशेने वळण घेतात. मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुले देखील आनंदी आहेत. सोहेल आणि सीमा यांच्या घटस्फोटाची बातमी त्याचा मोठा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा वेगळे झाल्यानंतर काही वर्षांनी समोर आली आहे. 2016 मध्ये त्यांनी वेगळे होण्याची घोषणा करण्यापूर्वी या जोडप्याच्या लग्नाला 18 वर्षे झाले होती तर मे 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.