हटके फोटोशूटमुळे सोनम होतेय ट्रोल

Sonam becomes a troll due to a shocking photoshoot
Sonam becomes a troll due to a shocking photoshoot

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोनम नेहमीच तिच्या लूक्समध्ये वेगवेगळी एक्सपेरिमेंट करताना दिसते. ती तिच्या फॅशनसेन्समुळे नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे पुन्हा एकदा सोनम चर्चेत आली आहे. सोनमने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सोनम कपूरने तिच्या सोशल मिडियावरील इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनमने Harpers Bazaar India या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्यामधीलच सोनमचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये सोनमने सिल्क डसेज सॅटिन ड्रेस आणि ट्राउजर परिधान केला आहे. ती या लूकमध्ये हटके अंदाजात दिसत आहे. यावरुन बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोनमची स्तुती केली आहे. तर दुसरीकडे सोनमला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Sonam becomes a troll due to a shocking photoshoot)

ट्रोल करणारा एक नेटकरी म्हणाला, ‘’काकू ही कोणती डिझायन आहे?’’  तर यानंतर दुसरा नेटकरी म्हणाला, गरुडाचे रुप घेतले आहे का?’’ सोबतच सोनमला एका नेटकऱ्यांने ‘’वल्गर’’ म्हटले आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com