Sonam Kapoor Birthday: सोनम कपूर फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध

Sonam Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
Sonam Kapoor Birthday: सोनम कपूर फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध
Sonam Kapoor BirthdayDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोनम कपूर प्रेग्नंट असल्याने तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे. सोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. तिने पती आनंद आहुजासह एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती खुप आनंदी दिसत आहे. सोनमच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्द्लच्या काही खास गोष्टी. (know this unknown thing about sonam kapoor )

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स ( ) आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. सोनम बऱ्याचवेळा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. तिचा प्रत्येक लुक हा नेहमीच चर्चेत असतो.

सोनम कपूरने केली वेट्रेसचे नोकरी

सोनम कपूरने बाॅलिवुडमध्ये (Bollywood ) येण्यापूर्वी चक्क वेट्रेसचे काम केले आहे. सोनम कपूर ही बॉलिवूड मधील प्रसिध्द कलाकार अनिल कपूर यांची मुलगी आहे. असं असतानाही तिला ही नोकरी करावी लागली होती. सोनम कपूरने हा जाॅब (Job) केवळ तिचा पॉकेटमनी वाढवण्यासाठी आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केला होता. जेव्हा सोनम अवघ्या 15 वर्षांची होती, तेव्हा तिने मलेशियातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली होती. या रेस्टॉरंटमध्ये ती वेटर म्हणून काम करायची. पण, सोनम कपूरने 1 आठवड्यातच ही नोकरी सोडली होती.

Sonam Kapoor Birthday
Priyanka Chopra चा ब्लॅक आणि व्हाइट रफल ड्रेसमधील ग्लॅमरस लुक

* वाढलेल्या वजनामुळे उडवली गेली खिल्ली

एकेकाळी सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये लठ्ठपणामुळे लोक अनेकदा तिला चिडवत असत. ज्याचा खुलासा खुद्द सोनमने केला होता. सोनम 15 ते 20 वयात असताना पीसीओओएस आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते. परंतु, आता स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते.

सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून (Movie ) बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी सोनम कपूरचे वजन खुप जास्त होते. संजय लीला भन्साळी यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. पहिल्या चित्रपटाच्यावेळी सोनमने जवळपास 30 किलो वजन कमी केले होते.

* सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम कपूरची एंगेजमेंट रिंग सर्वात महागड्या सेलिब्रिटी एंगेजमेंट रिंगपैकी एक आहे. अंगठीची किंमत सुमारे 90 लाख रुपये असुन ही अंगठी तिला आनंद आहुजाने भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com