सोनम कपूर 'सेलिब्रेशन मोड'मध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

ख्रिसमस यायला अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी बॉलिवूड सेलिब्रेटी आधीच सेलिब्रेशन मोडमध्ये आले आहेत. काहींचं ख्रिसमस शॉपिंग झालंय, तर काही जण घर सजवण्यात व्यस्त आहेत.

लंडन :  ख्रिसमस यायला अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी बॉलिवूड सेलिब्रेटी आधीच सेलिब्रेशन मोडमध्ये आले आहेत. काहींचं ख्रिसमस शॉपिंग झालंय, तर काही जण घर सजवण्यात व्यस्त आहेत. सोनम कपूर देखील या सेलिब्रिटींच्या बॅन्डवॅगनमध्ये सामील झाली आहे. अनिल कपूरची मुलगी अणि तरूणाईचं फॅशन सेन्सेशन असलेली सोनम कपूर सध्या लंडनमध्ये पती आनंद आहूजाबरोबर 'ख्रिसमस'ची तयारी करतेय. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर सोनमने तिच्या घरी सजवलेल्या 'ख्रिसमस ट्री'चा फोटोदेखील शेअर केला आहे. 

दरम्यान, अलीकडेच सोनम व पती आनंद आहूजाने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात संदर्भात एक पोस्ट शेअर केले. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला होता. आगामी काळात सोनम नेटफ्लिक्सच्या ए के व्हर्सेस ए या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर सोशल नुकताच शेअर करण्यात आला.

संबंधित बातम्या