सोनूचा चाहत्याला अजब मंत्र म्हणाला, ‘मुलगी शोधायची मेहनत तुम्ही घ्या’

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

देशभरातून लोकांकडून मदतीची मागणी करणारे मेसेज अजूनही सोनूला येत आहेत.

मुंबई: अभिनेता सोनू सूद कोरोना काळात देशभरातील लोकांना मदत करणारा 'मसिहा' म्हणून पुढे आला. देशभरातून लोकांकडून मदतीची मागणी करणारे मेसेज अजूनही सोनूला येत आहेत. कोणी मेडिकल बिल भरा म्हणत आहे, तर कोणाला घरभाडं भरण्यासाठी पैशांची गरज आहे. आणि सोनू प्रत्येक व्यक्तीला शक्य ती सर्व मदत करताना दिसतो. परंतु त्यातल्य़ा काहींनी फारच विनोदी कारणांसाठी त्याला मदत मागितली आहे.

सोमवारी सोनूच्या एका चाहत्य़ाने त्याच्या लग्नासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. ‘’सर तुम्ही लग्न लावून देऊ शकता का?’’ असा विनोदी प्रश्न विचारला आहे. त्याला सोनूनेही हटक्या विनोदी शैलीत उत्तर दिले आहे, तो म्हणतो, ‘’का नाही? लग्नाचे मंत्रही वाचेन, मात्र मुलगी शोधायची मेहनत तुम्ही घ्या.’’ याआगोदर बऱ्याच लोकांनी सोनूला अशाप्रकारचे विचारले होतं की आम्हाला गाडी घेऊन द्या. मालदिवची ट्रीप स्पॉन्सर कराल का, आमचा घटस्फोट करुन द्याल का.

Video: बॉबी देओलचा डान्स बघून चाहत्यांना झाली क्रिकेट अंपायरची आठवण

ज्या व्य़क्तीने मालदिवच्या ट्रीपबद्दल विचारले होता त्याला रिप्लाय देताना सोनू म्हणाला, कसं जाणार रिक्षाने जाणार, साय़कलवर की रिक्षाने? ज्याने गाडी मागितली होती त्याला उत्तर देताना सोनू म्हणतो, सेल्फ ड्राइव्ह कार हवी आहे की मी चालवायची आहे गाडी? तुम्हाला गाडी आवडेल आणि गाडीतला एसी कितीवर ठेवायचा आहे ते ही मला सांगा.

सोनूने लॉकडाऊनच्या काळात देशभरातील अनेक लोकांना मदत केली. सोनूला त्याच्या या कामासाठी संयुक्त राष्ट्रांकडून पुरस्काराने गौरवण्यातही आले. 

 

संबंधित बातम्या