सोनू म्हणतो बेडची व्यवस्था झाली; प्रशासन म्हणतं कल्पना नाही

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 मे 2021

त्या व्यक्तिला ओडिशामधील बेहरमपूर शहरातल्या गंजम सिटी रुग्णालयात बेड हवा होता.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच अभिनेता  सोनू सूद (Sonu Sood) कोरोना परिस्थितीमध्ये अनेकांना मदत करत आहे. कधी तो रुग्णांना बेड, कधी मजूरांना त्यांच्या घरी जायला मदत करत आहे, ऑक्सिजन (Oxygen) मिळवून देत आहे. पंरतु त्याच्या या कामाबद्दल आता एक सगळ्यांना गोधंळात टाकणारी माहिती मिळत आहे.

सोनूकडे एका व्यक्तिने ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली होती. त्या व्यक्तिला ओडिशामधील (Odisha) बेहरमपूर शहरातल्या गंजम सिटी रुग्णालयात बेड हवा होता. त्याच्या सोशल मिडियावरील ट्विटला उत्तर देताना सोनू म्हणाला, काळजी करु नकोस गंजम सिटी रुग्णालयामध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र 17 मे रोजी गंजम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोनूच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत सांगितलं की, आम्हाला सोनू सूद किंवा त्यांच्या फाऊंडेशकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आलेला नाही. सोनूच्या ट्विटमध्ये ज्या रुग्णाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तो कोरोना रुग्ण सध्या होमक्वॉरंटाईनमध्ये आहे आणि त्याची प्रकृती स्थीर आहे. रुग्णालयांमध्ये बेडची कोणत्याही प्रकारची समस्या नाही. बेहरामपूर महानगरपालिका लक्ष ठेवून आहे. (Sonu says the bed was arranged The administration says no idea)

चित्रपटगृहाचा पडदा कधी उघडणार? आगामी काळात चित्रपट OTT वर पहावे लागणार...

गेल्या आठवड्यामध्ये हे समोर आलं होत की, अभिनेता सोनू सूद फ्रान्स आणि इतर देशामधून ऑक्सिजनचे प्लांट आणत आहे आणि देशातील विविध भागामध्ये लावत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये तो हे प्लांट्स लावणार आहे.

''ऑक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन आम्ही नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देत आहोत. हे ऑक्सिजन प्लांट्स रुग्णालयांना तर ऑक्सिजन पुरवतील. शिवाय हे प्लांट्स रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर्सही भरुन देतील. यामुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांना अधिक बळ मिळेल,'' असं सोनू म्हणाला. या ऑक्सिजन प्लांट्सपैकी पहिला प्लांट फ्रान्समधून इकडे पाठवण्यात आला आहे. तो येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये भारतामध्ये पोहचेल अशी माहीती देण्यात आली आहे.

सोनू पुढे म्हणतो, ''सध्या कोरोनाशी लढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. परंतु आम्ही या आव्हानावरही मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून कोरोना रुग्णांचा जीव जाणार नाहीत असाच आमचा प्रयत्न असेल.''

सोनू सूद लवकरच 'किसान' या चित्रपटातून प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा सिनेमा ई. निवास यांनी दिग्ददर्शित केलेला आहे. तसेच सोनू 'आचार्य' या तेलुगु चित्रपटातही दिसणार आहे.

संबंधित बातम्या