Amala Paul: दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल हीला 'या' कारणावरून नाकारला केरळमधील मंदिरात प्रवेश

मंदिर प्रशासनावर टीकेची झोड; अमलाने विझिटर्स बुकमध्ये नोंदवला आलेला अनुभव
Amala Paul
Amala PaulDainik Gomantak

Amala Paul: सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉलला केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश नाकारला गेला. केरळच्या एर्नाकुलममधील तिरूवैरानिकुलम येथील महादेव मंदिरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर अमलाने मंदिर प्रशासनाने धार्मिक भेदभावाची वागणूक दिल्याची टीका केली आहे.

Amala Paul
Pathan: 'पठाण' भारताला आईसमान मानतो

अमला पॉल सोमवारी या मंदिरात महादेव आणि इतर देवींच्या दर्शनासाठी गेली होती. पण मंदिर प्रशासनाने येथील प्रथा-परंपरांचा दाखला देत तिला मंदिरात प्रवेश नाकारला. या मंदिराच्या आवारात केवळ हिंदूंनाच परवानगी असल्याचे तिला सांगण्यात आले.

त्यामुळे इतर धर्मियांना मनाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अमला हीला मंदिरासमोरील रस्त्यावरूनच देवीचे दर्शन घ्यावे लागले. तथापि, मंदिराच्या विझिटर्स बूकमध्ये अमलाने तिला आलेला हा अनुभव नोंदवला आहे.

Amala Paul
Throwback Photo: फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीने गोविंदा अन् सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट, ओळखलंत का?

तिने आपल्या अभिप्रायात म्हटले आहे की, देवीला पाहू शकले नाही पण लांबून तिची जाणीव झाली. 2023 मध्ये देखील धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे, हे दुःखदायक आणि निराशाजनक आहे. मी देवतेच्या जवळ जाऊ शकले नाही परंतु दुरूनच मला आत्मा अनुभवता आला. मला आशा आहे की धार्मिक भेदभाव लवकरच बदल घडेल. भेदभाव राहणार नाही. एक वेळ अशी येईल, जेव्हा आपल्याला धर्माच्या आधारे नाही तर समान वागणूक मिळेल.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यापासून तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर ट्रस्ट संचालित मंदिर प्रशासन चर्चेत आले आहे. मंदिर प्रशासन मात्र प्रोटोकॉलचे पालन करत असल्याचे म्हणत आहे. नेटकऱ्यांकडून या मंदिर प्रशासनावर टीका केली जात आहे.

केवळ धार्मिक कारणावरून मंदिर प्रशासनाचे असे वागणे अनेकांना खटकत आहे. दरम्यान, अमला ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गतवर्षात तिच्या 'कडावर' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने सर्वांनाच भुरळ घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com