दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार राम चरणला कोरोना

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

क्षिण भारतीय चित्रपटांचा तेलुगु सुपरस्टार अभिनेता राम चरणची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

चेन्नई : दक्षिण भारतीय चित्रपटांचा तेलुगु सुपरस्टार अभिनेता राम चरणची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने स्वत:च ट्विटरवरून ही माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. घरातच विलगीकरणात आहे. मी लवकरच बरा होईन, असे ट्विट त्याने केले. 

कोरोन संसर्ग झाल्यानंतर राम चरणने स्वत: ला क्वारंटाईन केले आहे. आणि गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचण्या करण्यास सांगितले आहे.

 

 

 

संबंधित बातम्या