Vijay-Ajit : जगभरातील कमाईच्या बाबतीत 'वारिसू'ने 'थुनिवू'ला मागे टाकले, 10व्या दिवसाचा बॉक्स ऑफिस अहवाल

थलपती विजय आणि अजित हे साऊथ इंडस्ट्रीतले तगडे सुपरस्टार आता बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडले आहेत
Thalpathy vijay
ajith
Thalpathy vijay ajith Dainik Gomantak

थलपती विजय आणि अजित कुमारचा वारिसू हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडले आहेत. दोघेही सुपरस्टार असले तरी यातला एक चित्रपट जास्त सरस ठरला आहे थलपथी विजयचा 'वारिसू' आणि अजित कुमारचा 'थुनिवू' बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देत आहेत. 

तथापि, थलपथी विजयच्या चित्रपटाने जगभरातील कमाईच्या बाबतीत अजित कुमारच्या चित्रपटाला मागे टाकले आहे. जाणून घ्या, दोन्ही चित्रपटांचे 10व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन काय आहे.

11 जानेवारी 2023 रोजी पोंगलच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर दक्षिणेचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले - 'वारीसू' आणि 'थुनिवू'. थलपथी विजयचा वारिसू हा चित्रपट तमिळ आणि तेलुगु तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता, तर अजित कुमारचा चित्रपट 'थुनिवू' फक्त तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. 

दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देत आहेत, पण जगभरातील कमाईच्या बाबतीत थलपथी विजयने अजित कुमारला मागे टाकले आहे. 10व्या दिवशी दोन्ही चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट जाणून घेऊया.

Thalpathy vijay
ajith
KL Rahul-Athiya Shetti: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला राहुल-अथियाचे शुभमंगल...

थलपथी विजयच्या वारीसू चित्रपटाने नवव्या दिवसापर्यंत देशभरात एकूण 131.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने 10 व्या दिवशी (शुक्रवारी) सर्व भाषांमध्ये 4.15 कोटी रुपयांची कमाई केली. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर परदेशातही याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

 वामसी पैडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात 233.5 कोटींचे कलेक्शन केले आहे. थलपथी विजय, रश्मिका मंदान्ना, शाम, प्रकाश राज आणि योगी बाबू यांच्यासह अनेक स्टार्सनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com