साउथ स्टार महेश बाबू म्हणतोय... 'बॉलिवूडला मी परवडणार नाही'

बॉलिवूड इंडस्टी मला विकत घेऊ शकत नाही त्यांच्या सोबत मला माझा वेळ देखील वाया घालवायचा नाही.
Mahesh Babu
Mahesh BabuDainik Gomantak

साउथ सिनेमा सुपरस्टार अ‍ॅक्टर महेश बाबू (Mahesh Babu) त्याच्या अ‍ॅकटिंग आणि सिनेमा मुळे ओळखला जातो. महेश बाबूने दक्षिण सिनेमा सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे. यावेळी महेश बाबू त्याच्या चित्रपटाच्या नाही तर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. महेश बाबूने बॉलिवूडला (Bollywood) चॅलेंज दिले आहे असं म्हणायला हरकत नाही. (South star Mahesh Babu says Bollywood industry cant buy me and I dont want to waste my time with them)

Mahesh Babu
शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याजवळील 21 मजली इमारतीला भीषण आग

बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत महेश बाबूने वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना महेश म्हणाला की, मला हिंदी चित्रपटांची ऑफर येत असते. पण मला असे वाटते की बॉलिवूड मला विकत घेऊ शकत नाही. आणि जी इंडस्टी मला विकत घेऊ शकत नाही त्याच्या सोबत मला माझा वेळ देखील वाया घालवायचा नाही.

महेश बाबूने साउथ इंडस्ट्रीबद्दल (South Industry) सांगितले की, त्याला येथे स्टारडम आणि सन्मान दोन्ही भरभरून मिळाले आहे. त्याच्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच महेश त्याच्या इंडस्ट्रीशिवाय इतर कोणत्याही चित्रपटाचा भाग होऊ इच्छित नाही. तो नेहमीच चित्रपट करणे आणि आपले नाव मोठे करण्याचा विचार करत असतो आणि त्याचे स्वप्नही आता पूर्ण होताना दिसत आहे. अभिनेता म्हणतो की 'त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे यापेक्षा तो आणखी आनंदी होऊ शकत नाही.'

महेश बाबू म्हणतो मला पैन इंडिया स्टार बनायचे नाही,

महेश बाबूने त्याच्या 'मेजर' या प्रोडक्शन व्हेंचरच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये त्याच्या आगामी बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितले. यादरम्यान त्याने तेलुगू चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर कामगिरीमुळे भारतीय चित्रपटाचा अर्थच बदलला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. महेश म्हणतो की त्याला पॅन इंडियाचा स्टार बनायचे नाही, त्यापेक्षा त्याला दक्षिण इंडस्ट्रीला मोठे करायचे आहे.

आगामी 'मेजर' चित्रपटाला महेश बाबूने केले प्रोड्यूस

बॉलीवू़ड ड्येबू 'मेजर' चित्रपटाला महेश बाबूने प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांआधींच रिलीज झाला आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांचा त्याग या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता आदिवी शेषने मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या विरुद्ध अभिनेत्री सई मांजरेकर आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com