साऊथचा नायक चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

चिरंजीवीने ट्विट करताना म्हटले आहे की,'मी आचार्य या चित्रपटाच्या चित्रीकरणारणा दरम्यान झालेल्या कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलो आहे. मात्र, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नसून स्वत:ला मी अलग करून घेतले आहे.

हैदराबाद- दक्षिणेतील चित्रपटांचा सुपरस्टार चिरंजीवीचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्याने ट्विट करून ही माहिती दिली असून आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगपूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. आपला आगामी चित्रपट 'आचार्य'च्या चित्रीकरणाच्या आधी ही चाचणी करण्यात आली होती. समाज माध्यमांवर आता त्याच्या लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना सुरू आहेत. 

चिरंजीवीने ट्विट करताना म्हटले आहे की,'मी आचार्य या चित्रपटाच्या चित्रीकरणारणा दरम्यान झालेल्या कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलो आहे. मात्र, मला कोरोनाची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नसून स्वत:ला मी अलग करून घेतले आहे. मला मागील ४ ते ५ दिवसांपूर्वी जे भेटलेले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. मी आपल्याला वेळोवेळी माझ्या स्वास्थ्याविषयी माहिती देत राहीन.'

संबंधित बातम्या