Kamal Haasan Hospitalised: सुपरस्टार कमल हसन यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात करण्यात आलं दाखल

साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन कोरोना पॉझिटीव्ह
दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन कोरोना पॉझिटीव्ह Dainik Gomantak

Kamal Haasan Hospitalised: साऊथ सुपरस्टार कमल हासन यांची तब्येत ठीक नसून त्यांची प्रकृती खराब असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी त्यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

अचानक कमल (Kamal Haasan) यांना रात्री ताप आल्याने चेन्नईमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील काही दिवस त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. वृत्तानुसार, ही एक नियमित वैद्यकीय तपासणी होती आणि डॉक्टरांनी कमल हसन यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यांना गुरुवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन कोरोना पॉझिटीव्ह
Vikram Gokhale Rumor of the Death: विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; पत्नीसह मुलीचा खुलासा

'बिग बॉस तमिळ' आणि त्याच्या राजकीय पक्षाच्या कर्तव्यांसह अनेक वचनबद्धतेमध्ये व्यस्त आहे. हैदराबादमध्ये त्यांचे सहकारी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतल्याने तो अलीकडेच चर्चेत होता. याशिवाय, कमल हसनने अलीकडेच एका प्रकल्पासाठी (KH 234) त्याचे नायकन दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत पुनर्मिलन करण्याची घोषणा केली होती. हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com