सुपरस्टार रजनीकांत राजकीय एन्ट्रीच्या तयारीत

rajnikant
rajnikant

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतने आपल्या राजकीय एन्ट्रीचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. आपल्या समर्थकांसह आज झालेल्या बैठकीनंतर रजनी यांनी हे संकेत दिले असून लवकरच आपण निर्णय जाहीर करू, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 

मागील दोन वर्षांपासून निरनिराळ्या राजनैतिक मुद्यांमध्ये ६९ वर्षीय सुपरस्टार रजनी आपले मत मांडत आहेत. मात्र, त्यांचे चित्रपटसृष्टीतील सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांच्या राजकारणाला उशीर होत राहिला आहे. कमल हसन यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते.  

रजनीकांत यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, ते येत्या काही दिवसांत आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर व्हर्चूअल बैठक घेतील आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आपल्या राजकारणातील प्रवेशाचा निर्णय घेतील. सुपरस्टार रजनी यांचे विधान निवडणुकांच्या बरोबर सात महिन्यांआधी आले आहे. या निवडणुकीपासून ते आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करतील, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. निवडणुकीच्या राजकारणा त्यांचा प्रवेश हा तेथील राजकारणातील ‘एक्स- फॅक्टर मानला जात आहे. राज्यात याआधीही अनेक फिल्मस्टार निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी झाले असल्याचा इतिहास आहे.                  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com