सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषीत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांना जगातील सर्वात मोठ्या  51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांना जगातील सर्वात मोठ्या  51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. रजनीकांत 71 वर्षांचे आहेत. पुरस्कार वितरण 3 मे रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, "आतापर्यंत हा पुरस्कार चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 नामांकित व्यक्तींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत यांच्या या पुरस्कारासाठी निवडल्यामुळे देशाला आनंद  होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या