दक्षिणात्य सुपरस्टार Kamal Haasan कोरोना पॉझिटीव्ह

दक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण झाली असून ही माहिती त्यांनी ट्वीटरवर दिली आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार Kamal Haasan कोरोना पॉझिटीव्ह
दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन कोरोना पॉझिटीव्ह Dainik Gomantak

साऊथ इडियामधील सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या कमल हसनला (Kamal Haasan) कोरोनाची लागण झाली आहे. ते अलीकडेच अमेरिका दौऱ्यावरुण परतले होते. त्यांना या दरम्यान कोरोनाची लागण झाली अशी माहिती त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी दिली आहे. त्यांनी लसीकरणाचे दोन डोस देखील घेतले होते.

आपल्या ट्वीटर अकाऊटवरुण कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेमधून परतीच्या मार्गावर असतांना त्यांना खोकल्याची समस्या जाणवत होती. त्यानंतर तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे समजले. सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन कोरोना पॉझिटीव्ह
शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाचे पहिले पोस्टर आले; ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

दक्षिणात्य सिनेमासह बॉलीवुडमधील अनेक चित्रपटांमध्ये कमल यांनी काम केले आहे. 1960 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. कमल हसन एक उत्तम अॅक्टर असून त्यांनी राजकारणातसुद्धा सहभागी झाले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी तामिळनाडूमध्ये कमल हसन यांचा पराभव केला. कोयंबतूर दक्षिण जागेवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. तामिळनाडू येथे सत्तातर झाले असून आता डिएके युती सत्तेत आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com