दाक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजा चित्रिकरणासाठी गोव्यात

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

दाक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजा हा आपल्या आगामी ‘क्रॅक'' या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील चित्रिकरणासाठी गोव्यात दाखल झाला आहे.

पणजी: दाक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजा हा आपल्या आगामी ‘क्रॅक'' या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील चित्रिकरणासाठी गोव्यात दाखल झाला आहे. हैदराबादमधील चित्रिकरण संपल्यानंतर त्याने गोव्याला जात असल्याविषयीचे विमान प्रवासातील छायाचित्रे आपल्या ट्विटरर अकाऊंटवर शेअर केली आहेत.

 
कमल हसनची मुलगी श्रृती हसनबरोबर रवी तेजा हा ‘क्रॅक'' चित्रपट करीत आहे. सरस्वती फिल्म डिव्हिजनच्या बॅनरखाली निर्माण होत असलेल्या या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रिकरण गोव्यात होणार आहे. त्यासाठी हैदराबादमधील चित्रिकरण संपल्यानंतर गोव्याकडे विमानाने येत असताना अभिनेता रवी तेजा यांनी दोन छायाचित्रे ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. त्यात एक छायाचित्र विना मास्कचे, तर दुसरे छायाचित्र मास्कसह आहे. पुढील वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. 

सध्या अनेक खासगी चित्रपट दूरचित्र वाहिन्यांवर रवी तेजा याचे दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करून दाखविले जातात. दक्षिणेत रवी तेजा सुपरस्टार अभिनेता म्हणून परिचित आहे. त्याचे वरलक्ष्मी सरथकुमार, समुथिराकनी, अली, देवी प्रसाद, चिराग जानी, मौर्यानी, सुधाकर असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही नुकतेच करण्यात आले आहे. `क्रॅक'' चित्रपटाचे चित्रिकरण गोव्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणावर होणार असून, त्यासाठीची स्थळे निश्‍चित झालेली आहेत.

संबंधित बातम्या