साऊथ सुपरस्टार देणार व्हॅलेंटाइन डेला आपल्या चाहत्यांना सरप्राईज

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट राधे श्यामच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्युज आहे. या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे. 

हैद्राबाद: साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट राधे श्यामच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्युज आहे. या चित्रपटाच्या टीझरची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे. प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर मेकर्स 14 फेब्रुवारी रोजी या रोमँटिक चित्रपटाची झलक दाखवणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. यासह निर्मात्यांनी सुपरस्टार प्रभासची आणखी एक झलक या व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना दाखवली आहे. ज्यात सुपरस्टार प्रभास युरोपच्या थंड हवेत ब्राउन टू शर्ट घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यावेळी अभिनेता पूर्णपणे प्रेमाच्या रंगात बुडलेला दिसतो आहे. प्रभासच्या चित्रपटाच्या या एका झलकनेच प्रेक्षकांना वेड लावले आहे. आतापासूनच या चित्रपटाचा टीझर आपण हा टीझर बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.  प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यात Glimpse of Radhe Shyam असे एक पोस्टर आहे. 

कुठे झाले या चित्रपटाचे शुटिंग?

सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले आहे. चित्रपट एक रोमँटिक लव्ह स्टोरी आहे. ज्यामध्ये प्रभाससोबत दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे दिसली आहे. पूजा हेगडेचा प्रभाससोबतचा हा  पहिला चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत हा चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होईल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी हा चित्रपट को-प्रोड्यूस केला आहे. याआधी प्रभासने बाहुबली आणि साहो सारख्या शानदार चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

प्रभास या चित्रपटांमध्ये व्यस्त
साउथ सुपरस्टार प्रभास लवकरच बॉलिवूडवर आपले राज्य करण्याची तयारी करत आहे. तन्हाजी दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात तो भगवान रामची भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर त्यांच्याकडे केजीएफ 2 फेम दिग्दर्शक प्रसार नीलचा सालार आणि महान दिग्दर्शक नाग अश्विनचा आगामी साय-फाय चित्रपट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

संबंधित बातम्या