कोरोना गेला उडत; आम्ही थेटरला मास्टर बघणारच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

दाक्षिणात्या सुपरस्टार विजय सेतुपती  अभिनीत  ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला. लॉकडाउनमुळे बंद असलेली सिनेमागृह आता हळूहळू पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. ‘

मुंबई: दाक्षिणात्या सुपरस्टार विजय चंद्रशेखर आणि विजय सेतुपती  अभिनीत  ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला. लॉकडाउनमुळे बंद असलेली सिनेमागृह आता हळूहळू पुन्हा सुरु होऊ लागली आहेत. ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन १९८४’ या हॉलिवूडपटांनासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. हे चित्रपट कोरोना काळातच प्रदर्शीत झाले. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रिलीजच्या झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलाच  विक्रम साकारला आहे. 

कोविड साथीच्या काळातही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ओपनिंग शोसाठी बुधवारी पहाटेपासूनच विजय चंद्रशेखर आणि विजय सेतुपती या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. या गर्दीनं लॉकडाउनच्या नियमांचं देखील उल्लंघन केल्याचं दिसून येत आहे. सिनेमागृहाबाहेर झालेल्या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

चित्रपट प्रदर्शक विशेक चौहान यांनी बुधवारी शहरातील आणि अगदी मुंबईबाहेरील चित्रपटगृहांमधील फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले. दरम्यान, दक्षिणेकडील अभिनेत्री कीर्ती सुरेशने सोशल मीडियावर खुलासा केला की, एका वर्षानंतर मास्टर पाहण्यासाठी ती थिएटरमध्ये परतली आहे.

लोकेश कानगराज दिग्दर्शित या मास्टर चित्रपटामध्ये मलाविका मोहनन, अर्जुन दास, आंद्रिया जेरिमे आणि शांतानू भाग्यराज हे मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी 14 जानेवारी रोजी हिंदीमध्ये डब केलेला हा चित्रपट उत्तर भारतमधील सिनेमांमध्ये प्रदर्शित करण्याची योजनाही आखली आहे.

राज्यात दिवसभरात नव्या करोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत दीडपट अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ही राज्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पण दुसरीकडे करोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.  तरी तो तितका धोकादायक नसल्याने चिंतेची बाब नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण सध्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत ५०,१०१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात सध्या ५२,२८८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

 

संबंधित बातम्या