'ती' ची गोष्ट, जबरदस्त आणि अभिनय बिनधास्त,  या पाच वुमन लिड सिरीजमधुन महिलांनी दिला स्ट्रॉंग मॅसेज

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

अनेकजन वेब सिरिज पाहण्याला पसंती देतात. त्यामुळे आज अशा पाच वेब सिरीजसबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये महिलाच नेतृत्व केल आहे

Women Led Series: जगभरात कोरोना विषाणूने (Corona virus) थैमान घातल आहे. याचा वाईट परिणाम मनोरंजन क्षेत्रावारही (Entertainment) पडला आहे. थेटर्स बंद आहेत. त्यामुळे सर्वे चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत.  यामुळे आपले चांगलेच मनोरंजन होत आहे. परंतु अनेकजन वेब सिरिज पाहण्याला पसंती देतात. त्यामुळे आज अशा पाच वेब सिरीजसबद्दल (Web series) जाणून घेऊया ज्यामध्ये महिलाच नेतृत्व केल आहे. (Strong message given by women from these five women led series)

Netflix series Bombay Begums gets a release date | Entertainment News,The  Indian Express

नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झालेली 'बॉम्बे बेगम' मध्ये महत्वाकांशी असलेल्या पाच महिलांची गोष्ट आहे. या सिरिजमध्ये  त्या महिलांचे आयुष्य हे एकमेकांशी जोडलेल आहे. फर्टिलीटीपासून ते लैंगिक छळ यासारख्या विषयापर्यंत या 'बॉम्बे बेगम' या सिरीजने समाजातील अनेक गोष्टीवर भाष्य केलेले आहे. या वेबसिरिजबद्दल दर्शकानी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 

Watch] It gets messy in the web series 'Ladies Room'
स्टार सिरिज  'लेडीज रूम' पाहून आपल्याला नक्कीच हसू फुटेल. भरपूर विनोदपूर्ण असलेली ही मालिका एका समाजिक विषयाकडे लक्ष वेधले आहे. या सिरिजमध्ये प्रौढ असलेल्या दोन महिलांमध्ये असे दाखवण्यास आले की जेव्हा त्या बाहेर पडतात तेव्हा त्यांना वॉशरूम मधील समस्याना कसे तोंड द्यावे लागते. यात गंमतीची गोष्ट म्हणजे या सिरिजची शूटिंग 6 वेगवेगळ्या वॉशरूममध्ये  केली आहे. तुम्ही ही सिरिज यूट्यूबवर पाहू शकता. 

Prime Video: Made In Heaven - Season 1

'मेड इन हेव्हन' या वेबसिरीजचा दूसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ही सिरिज अनेकांच्या पसंतीची आहे. कारण ही सिरीज लग्न सोहळ्यावर आधारित आहे. अमेझॉन प्राइम व्हीडिओची ही सिरिज आहे. ही सिरिज आपल्याला खूप हसवेल, थोडे रडवेल, परंतु मनोरंजनाच खंजिनाच  आहे.

Prime Video: Four More Shots Please! - Season 2

'फोर  मोअर शॉटस प्लीज' ही वेब सिरिज चार महिलांवर आधारित आहे. या महिला त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्याना घेऊन झगडत असतात. परंतु या चार मैत्रिणी जेव्हा जेव्हा एकमेकाना भेटतात तेव्हा त्या एकमेकांच्या  सहवासाचा आनंद लुटतात. या वेब सिरिजच्या कास्टची केमिस्ट्रि, गोष्टीच वेगळेपण आणि नाटक आपल्याला आकर्षित करते. अनेकाना  ही वेबसिरिज पाहून आपल्या शाळेतील, कॉलेजमधील मित्र-मैत्रीणीची आठवण येतील. ही वेब सिरिज अमेझॉन प्राइम व्हीडिओवर पाहता येणार आहे. 

What is your review of Leila (Netflix TV series)? - Quora

आपण 'लैला' ही वेब सिरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकतो. ही वेब सिरिज एका महिलेची गोष्ट आहे. या सिरिजमध्ये महिलेच्या पतीचा मृत्यू झालेला असतो. ती महिला आपल्या मुलीचा  शोध घेताना दाखवली आहे. अशा परिस्थितीत ती महिला अशा ठिकाणी जाऊन पोहोचते जिथे अनेक महिलांवर अत्याचार केले जात आहे. ही वेबसिरिज देशाच भविष्य दाखवीत आहे. हे पाहून आपल्याला धक्का बसू शकतो. दीपा मेहता यांनी ही वेब सिरिज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसत आहे.  

संबंधित बातम्या