'सरमाऊंटिंग चॅलेंजेस’तर्फे दिल्ली मेट्रोची यशोगाथा

मात्र हे यश साध्य करण्याआधी ही मेट्रो बांधत असताना संबंधित विभागांसमोर आलेल्या आव्हानांची आपल्या कल्पना आहे का?
'सरमाऊंटिंग चॅलेंजेस’तर्फे दिल्ली मेट्रोची यशोगाथा
Success story of Delhi Metro through Surmounting ChallengesDainik Gomantak

पणजी : दिल्ली (Delhi) शहराची जीवनवाहिनी होण्यापासून ते शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि जीवघेणे अपघात कमी करण्याऱ्या दिल्ली मेट्रोने (Metro) आज सर्वच दृष्टीने जागतिक दर्जाची जलद वाहतूक व्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र हे यश साध्य करण्याआधी ही मेट्रो बांधत असताना संबंधित विभागांसमोर आलेल्या आव्हानांची आपल्या कल्पना आहे का?

गोव्यात (Goa) सुरु असलेल्या इफ्फीत ‘सरमाऊंटिंग चॅलेंजेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा चित्रपट दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामावर आधारित आहे. २०११ साली सुरु झालेले हे बांधकाम जवळपास २०२० साली संपले. या दहा वर्षांच्या काळात आम्ही मेट्रो बांधकामातल्या सर्व घडामोडींचे सातत्याने चित्रीकरण करत होतो.

Success story of Delhi Metro through Surmounting Challenges
सत्‍यजीत रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेत उतरायचे

मेट्रोशी जिव्‍हाळा

मेट्रोसोबतचा आपला जिव्हाळा व्यक्त करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पांडे म्हणाले, आपला मेट्रोशी असलेला ऋणानुबंध खूप जुना आहे. २७ वर्षांपूर्वी त्यांनी दिल्ली मेट्रोवरच आपला पहिला चित्रपट बनविला होता. मुंबई, नागपूर, पुणे, लखनौ, कानपूर, गोरखपूर, आग्रा आणि जयपूर या शहरांतील मेट्रो प्रकल्पांवरही आपण अनेक चित्रपट तयार केले आहेत, असे ते म्‍हणाले. दरम्‍यान, ‘द ड्रीम फुलफिल्ड-मेमरीज ऑफ द इंजिनीअरींग चॅलेंजेस’ या चित्रपटासाठी पांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com