Thalapathy 65 First Look: दक्षिणात्य सुपरस्टारचा राउडी लूक

Thalapathy 65 First Look
Thalapathy 65 First Look

Thalapathy 65 First Look: दक्षिणात्य सुपरस्टार, थलापथी विजयची क्रेझ त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचे चाहते केवळ दक्षिण भारतातच नाही तर जगभरात आहेत. ज्यांना त्याचे चित्रपट आणि त्याच्या खास शैलीबद्दल खुप आकर्षण आहे. विजय चित्रपटांमध्ये ज्या ज्या लूकमध्ये दिसला, त्याचा तो लूक बघून त्याच्यावर पॅन्स फिदाच होतात असं  म्हणायला हरकत नाही. 22 जून म्हणजे आज विजयचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या एक दिवसाआधी त्याच्या आगामी ‘थलापथी 65’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. सुपरस्टार विजयचा हा 65 वा चित्रपट आहे, म्हणून चित्रपटाचे नाव 'थलापथी 65' असे ठेवले गेले होते पण आता निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे नाव 'बीस्ट' असे जाहीर केले आहे.(Sun Pictures has released another look of Tamil superstar Vijay from his upcoming film Beast)

सन पिक्चर्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर प्रोडक्शन कंपनी सन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'थलापथी 65' चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. विजयच्या या चित्रपटाचे नाव 'बीस्ट' आहे. चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये विजय एका दमदार लूकमध्ये दिसला, विजय हातात एक मोठी बंदूक घेत आहे आणि त्याची मस्कुलर बॉडी दाखवतांना दिसला. विजयचा लूक एकदम राउडी दिसत आहे. चित्रपटाचा पहिला लूक पाहून, हे निश्चित आहे की या चित्रपटात बँग एक्शन सीक्वेन्स चाहत्यांना बघायला मिळणार आहे. 

'बीस्ट' चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे. थलापथी 65 म्हणजेच बीस्ट चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. सन पिक्चर्सच्या या पोस्टरला काही मिनिटांत हजारो रिट्वीट आणि लाइक्स मिळाले आहेत. विजयच्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com