'बॉलीवुड गंजेड़ियों-नशेड़ियों से भरा नहीं', सुनिल शेट्टीने पत्रकाराचा घेतला समाचार

फिल्म इंडस्ट्रीतील लोक ड्रग्ज घेत नसतात. मीडियामध्ये जे चित्रित केले जाते ते सत्य नसते- सुनिल शेट्टी
Bollywood actor Sunil Shetty
Bollywood actor Sunil Shettydainik gomantak

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचे चाहते चित्रपटसृष्टीवर नाराज आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, बॉलिवूडला विशेषत: ड्रग्सचा अँगल आला, तेव्हापासून सोशल मीडियावर बॉयकॉट सारखे ट्रेंड सतत दिसत आहेत. यावर आता सुनील शेट्टीने देखील भाष्य केले आहे. तो म्हणतो की, 'बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण ड्रग अॅडिक्ट नाही.' त्याने काही स्टारकिड्सना देखील ड्रग्सच्या बाबतीत त्यांच्या चुकांसाठी माफ केले पाहिजे, असे म्हटले आहे (Suniel Shetty Says Bollywood Is Druggies)

ड्रग्जविरोधातील कार्यक्रमाला सुनील शेट्टीची उपस्थिती

सुनील शेट्टी रविवारी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरुद्धच्या दिनानिमित्त केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका कार्यक्रमात गेला होता.या कार्यक्रमात त्याने भाषण केले आणि यावेळी त्याला विचारण्यात आले की, सेलिब्रिटीं ड्रग्जच्या आहारी जाते का आणि त्यांना लक्ष्य केले जाते अस तुला वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना सुनिलने हे स्पष्टिकरण दिले.

Bollywood actor Sunil Shetty
Ranbir Kapoor On His Children: लग्नाच्या अगोदरच झालं 'प्लॅनिंग', मुलांच्या नावानं टॅटूही तयार

असे 300 मित्र आहेत ज्यांनी आयुष्यात काहीच केले नाही

मी 30 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि माझे 300 मित्र आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात काहीही केले नाही. फिल्म इंडस्ट्रीतील लोक ड्रग्ज घेत नसतात. मीडियामध्ये जे चित्रित केले जाते ते सत्य नसते, जिथे बॉयकॉट बॉलीवूड आणि बॉलीवूड ड्रग्स सारखे हॅशटॅग शेअर केले जातात, असे उत्तर सुनील शेट्टीने बॉलीवूड सेलिब्रिटी ड्रग्जच्या बाबतीत कशा प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात येतात हे सांगतांना दिले.

Bollywood actor Sunil Shetty
वाढलेल्या वजनामुळे अल्लू अर्जुनला 'वडा पाव' म्हणणाऱ्यांची पीव्ही सिंधूने केली बोलती बंद

नाबालिक समजून माफ करा

बॉलीवूड ड्रग्ज घेणाऱ्या लोकांचे नाही.आपण चुका करतो, या चूकांकडे मुलांसारखे बघून माफ करायला पाहिजे. हॅशटॅग बॉयकट बॉलीवूड, हॅशटॅग बॉलीवूड ड्रग्स असे बघण्यात काही अर्थ नाही, असे मत सुनिलने या कार्यक्रमानंतर व्यक्त केले. दरम्यान जून महिन्यात शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला बेंगळुरू येथील एका पार्टीतून ड्रग्ज घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते.नंतर त्याला जामीन मिळाला.शाहरुख खानच्या आर्यनलाही 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com