Bollywood News: हेरा फेरी सिनेमात कार्तिक आर्यन घेणार अक्षयची जागा?; यावर सुनिल शेट्टी म्हणाला...

Sunil Shetty: हेरा फेरी 3 सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत असणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Akshay Kumar and Suniel Shetty
Akshay Kumar and Suniel ShettyDainik Gomantak

Bollywood News: बॉलिवुडच्या विनोदी चित्रपटांच्या रांगेतला 'हेरा फेरी' हा टॉप क्लास सिनेमा आहे. प्रेक्षकांना खळखळुन हसवणारा हा सिनेमा आज पण टीव्हीवर लागला तर लोकांचे भरपूर मनोरंजन करतो. या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या जोडगोळीने धमाल उडवून दिली होती. त्यानंतर 'फिर हेरा फिरी' हा दुसरा भाग पण सुपरहीट झाला. आता याचा तिसरा भाग येणार आहे. पण या भागात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल मुख्य भूमिकेत असणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. यावर सुनिल शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.

या सिनेमात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार, अशी सगळीकडे चर्चा सुरु आहे. पण माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, अक्षय कुमारला हेरा फेरी सिनेमात घेतलं तर चांगलं होईल. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अक्षयच्या जागी असेल अशी चर्चा मी ऐकतोय. पण निर्मात्यांनी कार्तिकला वेगळ्या भूमिकेसाठी घेतले असावे कारण अक्षयची जागा कोणी घेऊ शकत नाही.

Suniel Shetty
Suniel ShettyDainik Gomantak
Akshay Kumar and Suniel Shetty
Nawazuddin Siddiqui New Movie : 'हड्डी'साठी नवाजुद्दीन सिद्दीकी बनला ट्रान्सजेंडर! शेअर केला चित्तथरारक अनुभव

याविषयी नेमकं काय होतंय हे पहावं लागेल. अक्षय या सिनेमात नसेल त्याची कमी जाणवेल. सध्या मी माझ्या धारावीशी संबंधीत सिनेमाच्या शुटींगसध्ये बिझी आहे.या गोष्टींबाबत मला फार माहीत नव्हते. नोव्हेंबरनंतर मी हे सगळं समजुन घेईल. या विषयी अक्षयसोबत बोलेल, असे सुनिल शेट्टी (Sunil Shetty) म्हणाला.

Akshay Kumar
Akshay KumarDainik Gomantak

याच सिनेमाविषयी अक्षय कुमारने (Akshay Kumar) एका मुलाखतीत भाष्य केले होते. तो म्हणाला, हेरा फेरी सिनेमाच्या खूप आठवणी आहेत. पण इतक्या वर्षांत आम्ही याचा तिसरा भाग बनवला नाही, याची खंत वाटते. मला या सिनेमाची मागे ऑफर देण्यात आली होती. पण मला स्किनप्ले आणि स्क्रिप्ट फार आवडली नाही. मी त्याबाबत समाधानी नव्हतो. आता एवढ्या दमदार सिनेमासाठी निर्माते, दिग्दर्शक कोणाला घेणार? हे येत्या काळात पहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com