Sunil Shetty :"हात धरण्यासाठी योग्य हात अन्" सुनिल शेट्टींनी लेक - जावयासाठी भावुक होत लिहिली पोस्ट...

सुनिल शेट्टी यांनी लाडकी लेक अथिया आणि केएल राहुल यांच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे
Suniel Shetty
Suniel Shetty Dainik Gomantak

Suniel Shetty सुनील शेट्टीचा आनंद सध्या गगनात मावत नाही असंच म्हणावं लागेल.  एकीकडे त्यांनी त्यांची मुलगी अथियाचं लग्न केले, तर दुसरीकडे जावई केएल राहुलच्या रूपाने त्यांना मुलगाही मिळाला आहे. यामुळे सुनील शेट्टीला प्रचंड आनंदी आहे. त्याने आता मुलगी अथिया आणि जावई केएल राहुलसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे, जी सर्वत्र चर्चेत आहे.

लाडक्या लेकीच्या लग्नात सुनील शेट्टींनी प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडली. ते स्वत: सर्व व्यवस्था पाहत होते आणि कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेत होते. एवढेच नाही तर सुनील शेट्टींनी पापाराझी आणि मीडियाचीही काळजी घेतली. त्यांच्यासाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था तर केलीच पण नंतर ते स्वतः मिठाई देण्यासाठीही पोहोचले.

अथिया शेट्टीच्या लग्नाच्या निमित्ताने सुनील शेट्टींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, आता तो सासरा झाला आहे, पण त्यांना एक मुलगाही मिळाला आहे, जो चांगला आहे. 

आता सुनील शेट्टीने अथिया आणि जावई केएल राहुलसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलांसाठी देवाकडे आशीर्वाद मागितला आहे. 

Suniel Shetty
Madhya Pradesh: दिलजले आशिकने सुरु केला चहाचा स्टॉल, नाव ठेवले 'M बेवफा चाय वाला'

सुनील शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. या फोटोवर सुनील शेट्टीने लिहिले की, '"हात धरण्यासाठी नेहमीच एक हात असतो आणि विश्वास ठेवण्याचे कारण असते कारण कधीकधी एखादी व्यक्ती हीच योग्य जागा असते आणि योग्य गोष्ट म्हणजे प्रेम आणि विश्वास. माझ्या मुलांचे अभिनंदन... देव त्यांना आशीर्वाद देईल".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com