Sunny Deol Upcoming Movie : दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल 25 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार ?

दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल पुन्हा एकत्र येणार
Sunny Deol 
Rajkumar Santoshi
Sunny Deol Rajkumar Santoshi Dainik Gomantak

Sunny Deol's Upcoming Movie: 80 च्या दशकात आपल्या तगड्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सनी देओलचे माईल स्टोन चित्रपट आजही आवडीने पाहिले जातात. घायल, घातक, दामिनी हे चित्रपट तर आजही लोकांच्या आवडीचे आहेत.

या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे होते. गेले बराच काळ राजकुमार संतोषी आणि सनी देओल एकत्र आले नाहीत. तब्बल 25 वर्षांचा हा गॅप भरुन काढण्यासाठी आता ही जोडी सज्ज झाली आहे.

80 आणि 90च्या दशकातले चित्रपट सनी देओल या नावाशिवाय अपुर्ण आहेत. खिळवुन ठेवणाऱ्या कथा, तगडा अभिनय, दिग्दर्शन या जोरावर सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

आता दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे सनी देओलसोबत एक चित्रपट करत असल्याची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट एका नाटकावर अवलंबुन असल्याची माहिती समोर आली आहे.

Sunny Deol 
Rajkumar Santoshi
Shah Rukh Khan At Film Festival: किंग खानच्या नावे नवा खिताब,रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला केलं जाणार सन्मानित

लेखक असगर वजाहत यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. “जिस लाहोर नाई देखा ओ जमै नाय’ असं या चित्रपटाचं नाव असुन अभिनेते सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमीकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट एका नाटकावर आधारित असुन मी आणि असगर याच्यावर काम करत आहोत असं राजकुमार संतोषी यांनी सांगितलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असुन प्रेक्षकही चित्रपटाला स्वीकारतील हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com