Birthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सनी लिओनीचा आज वाढदिवस

सनीची फॅन फॉलोइंग इतर कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.
Birthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सनी लिओनीचा आज वाढदिवस
Sunny LeoneDainik Gomantak
Published on

अभिनेत्री सनी लिओनीच्या सौंदर्याचे चाहत्यांना वेड लावले आहे. सनी लिओनीने जेव्हापासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून अभिनेत्रीला चाहत्यांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. यामुळेच सनीची फॅन फॉलोइंग इतर कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. अभिनेत्रीने नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र तरीही सनीचे नाव अनेकवेळा वादांशी जोडले गेले आहे. आज, अभिनेत्रीच्या 41 वा वाढदिवस आहे.

Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak

मधुबन या गाण्यावरून गदारोळ
गेल्या वर्षी 2021 मध्ये रिलीज झालेल्या सनी लिओनीच्या 'मधुबन' या गाण्याने चांगलाच गदारोळ केला होता. या गाण्याच्या बोलांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. गाण्याच्या बोलांवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मथुरेच्या पुजार्‍यांपासून ते मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याचा निषेध केला. मधुबन या गाण्यावर सनीच्या अश्लील डान्समुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे मथुरेच्या पुजाऱ्यांनी सांगितले.

Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak

नवीन वर्षात कार्यक्रम करण्याची परवानगी नव्हती
2017 मध्ये, बेंगळुरू पोलिसांनी सनी लिओनला शहरातील नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये परफॉर्म करण्यास परवानगी नाकारली. यावेळी कर्नाटक रक्षा वैदिक युवा सेनेच्या सदस्यांनी सनी लिओनीचे पोस्टर जाळले. हा कार्यक्रम आपल्या संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात असल्याचे संघटनेचे मत होते.

Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak

कपिल शर्मा शो
सन 2013 मध्ये 'द कपिल शर्मा शो'मध्ये सनीला तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नाकारण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. कपिलने अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यास नकार दिल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, ती 2014 मध्ये 'रागिनी MMS 2' च्या प्रमोशनसाठी एकता कपूरसोबत शोमध्ये दिसली होती.

Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak

सेलिना जेटलीचे अपार्टमेंट
2012 मध्ये, सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर भारतात नव्याने आले होते. त्यावेळी अभिनेत्री सेलिना जेटलीने पुढाकार घेत त्यांना आपले मुंबईतील पेंटहाऊस दोन वर्षांसाठी भाड्याने दिले होते. पण त्यानंतर 2015 मध्ये सेलिनाने या जोडप्याला घरातून बाहेर काढले होते. यामागील कारण स्पष्ट झाले नाही.

Sunny Leone
Sunny LeoneDainik Gomantak

सनी लिओन विरुद्ध कमाल खान
सनी लिओन आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान यांच्यात मोठा वाद झाला होता. या वादाचे कारण होते सनीचे वादग्रस्त ट्विट. कमाल खान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सनी लिओनीच्या व्हायरल ट्विटवर निशाणा साधत कमलने ट्विटरवर ट्विट केले की, "हे घ्या... सनी लिओनी म्हणते की बलात्कार हा गुन्हा नाही, तो फक्त एक सरप्राईज सेक्स आहे." मात्र, सनीने नंतर व्हायरल ट्विट आपण पोस्ट केले नसल्याचे सांगितले होते. सनीने ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.