सनी लियोनचा नवीन 'ट्रान्सपरंट मास्क' बघून चाहते घायाळ...

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

आपले नवनवीन फोटो पोस्ट करत सनी लियोन कायम प्रेक्षकांना थक्क करते. यावेळीही सनीच्या एका एशाच फोटोमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सनी लियोन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आपले नवनवीन फोटो पोस्ट करत ती कायम प्रेक्षकांना थक्क करते. यावेळीही सनीच्या एका एशाच फोटोमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सनीने ट्रान्सपरंट मास्क घालून फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिचे तोंड आणि नाक कव्हर झाले आहे. मात्र, यातून तोंड झाकले जात नसून नेहमीप्रमाणे छान दिसत आहे. विशेष म्हणजे या मास्कमुळे मेकअपही खराब होणार नाही.     

सनीने केलेला मेकअप या मास्कमधूनही स्पष्ट दिसत असून तिने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, 'शूटच्या मध्ये स्वत:चे संरक्षण करण्यासाठी हे मास्क घातले असून यामुळे मास्कही खराब होणार नाही.' सनीच्या या मास्कची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा असून तिच्या चाहत्यांना हा मास्क अतिशय आवडलाही आहे. 

बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सनीला आता ८ वर्ष झाले आहेत. आपल्या या प्रवासाबद्दल सनीने म्हटले होते की,'मी खूप आभारी आहे की मला एवढं सगळं मिळालं. लोकांनी मला प्रचंड प्रेम दिले आहे. हा प्रवास अनेक संकंटांनी भरलेला होता. या काळात बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या. मात्र,  वाईट गोष्टी घडूनही काही चांगल्या गोष्टींमुळे वाईट गोष्टी लक्षात राहिल्या नाहीत. माझा प्रवास बाकी लोकांच्या प्रवासापेक्षा वेगळा आहे. मी प्रचंड भाग्यवान आहे की थोडा वेळ लागला पण लोकांनी मला आपलं मानलं. माझ्या फॅन्सनी माझे करिअर सेट करण्यात मदत केली. माझे फॅन्स नसते तर कदाचित आज मी इथे दिसली नसती.'
 

संबंधित बातम्या