कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
Supreme Court consoles comedian Munawwar Farooqi

नवी दिल्ली: प्रसिध्द कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने इंदौर मध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात हिंदू देव देवतांसह देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अपामन केला आसल्याच्या आरोपाखाली मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत असणाऱ्या मुनव्वर फारुकीची याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालय़ाने फेटाळली होती. यानंतर फारुकीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फारुकीला 2 जानेवारीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती.

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने फारुकीचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करत मध्यप्रदेश पोलिसांना नोटीसही पाठवली आहे. मुनव्वर फारुकीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. तसेच लीव पीटिशन देखील दाखल करकण्यात आली होती. या फारुकींच्या दोन्ही याचिंकावर न्यायमूर्ती नरिमन, आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्य़ा खंडपीठाने सुणावणी केली आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेश पोलिसांनी काढलेल्या वॉरंटला ही स्थगिती दिली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com