"सूर्यवंशी' आणि 83 पडद्यावरच

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

दिवाळी आणि नाताळपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई

सध्या चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक निर्माते-दिग्दर्शक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. सोमवारी हॉटस्टारने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची घोषणा केली. त्यामध्ये "लक्ष्मी बॉम्ब', "भुज द प्राईड ऑफ इंडिया', "छलांग', 'सडक2', "द बिग बुल' अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित "सूर्यवंशी' आणि कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपट मात्र मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा "गुलाबो सिताबो' हा चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. अन्य काही चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. अनेक दिवस चर्चेत असलेले "सूर्यवंशी' आणि 83 हे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.
"सूर्यवंशी' चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले असून, अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. कतरिना कैफही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कबीर खान यांचा 83 हा चित्रपट भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1983 मधील विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.

बिग डेव्हलपमेंट
""बिग डेव्हलपमेन्ट ... #सूर्यवंशी आणि #83 चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे. सूर्यवंशी दिवाळीत आणि 83 नाताळमध्ये रिलीज होण्याची शक्‍यता आहे,'' असे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ट्विटर पेजवर जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या