सुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा जामीन मंजूर

सुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा जामीन मंजूर
Sushant Singh

मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा(sushant singh rajput) जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानी(siddharth pithani) याला सुशांतसिंग राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थला लग्नासाठी 15 दिवसांचा जामीन मिळाला आहे. माध्यमांशी बोलतांना सिद्धार्थचे वकील तारक सय्यद म्हणाले, " पर्सनल कारणास्तव त्यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे.  2 जुलै रोजी त्याला पुन्हा सरेंडर करावे लागणार आहे." यापूर्वी कोर्टाने सिद्धार्थचा जामीन अर्ज फेटाळला होता.

गेल्या आठवड्यात सिद्धार्थने जामीन याचिका दाखल केली होती. कोर्टासमोर जामिनासाठीच्या इतर कारणांपैकी त्याने 26 जून रोजी आपल्या लग्नाचे कारण सांगितले होते. त्यांचे वकील तारक सय्यद यांच्यामार्फत केलेल्या जामीन याचिकेमध्ये पिठानी यांनी दावा केला होता की या खटल्यात त्यांना खोटे आरोपाखली फसविण्यात  आले होते. याचिकेत म्हटले आहे की, या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे दर्शविणारा कोणताही मादक पदार्थ किंवा साहित्य सापडले नव्हते, त्याचा दूरदूरपर्यंत अंमली पदार्थांच्या व्यापारात संबंध नव्हता.

बऱ्याच दिवसांपासून एनसीबीला चकरा देत असलेला पिठानी आपल्या नवीन सोशल मीडिया अकाउंटद्वारे तपास यंत्रणेकडे पोहोचला होता. सुशांतच्या निधनानंतर सिद्धार्थने त्यांचे जुने खाते त्याने बंद केले होते. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने आपले नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले आणि आपली काही फोटो शेअर केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

सिद्धार्थ पिठानीने वारंवार निवेदने बदलली 
सिद्धार्थ पिठणी सुशांतच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक होता. तो त्यांच्यासोबत सुशांतच्या घरी राहत होता. सुशांतच्या शेवटच्या दिवसांत, सिद्धार्थ त्याच्या जवळ होता, म्हणूनच पोलिस आणि सीबीआयनेही सिद्धार्थला खूप विचारपूस केली. या कारवाईत सिद्धार्थ सतत निवेदने बदलत गेला. ,सुशांत बद्दल काही प्रश्न विचारले असता त्याने शेवटच्या वेळी आपली बाजू का बदलली? असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com