सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

 अटक केलेल्या व्यक्तीचे नाव हेमल शहा (Hemal Shah) आहे.

प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणामध्ये NCB कडून अजून अटकसत्र सुरुच असून या प्रकरणात ड्रग्जचा (Drugs) अ‍ॅंगल येताच  गेल्या वर्षभरापासून मोठ्याप्रमाणामध्ये धरपकड करण्यात आली. अशातच गोव्यातून (Goa) एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव हेमल शहा (Hemal Shah) आहे. या ड्रग्ज पेडरला सुशांत सिंह प्रकरणात अटक (Arrest) केल्याने एकच हल्लकल्लोळ माजला आहे. NCB च्या पथकाने शहाला अटक करुन गोव्यातून मुंबईला (Mumbai) आणलं.  (Sushant Singh Rajput case One arrested from Goa)

याआगोदर, NCB ने सुशांत सिंह प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज पेडलरांना अटक केली होती. हेमल शहाच्या अटकेनंतर सुशांत मृत्यू प्रकरणातील अनेक खुलासे होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्य़े बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली. यानंतर अनेक ड्रग्ज पेडरलर्संना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर कारवाई करत अटक केली होती. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांच्यातील संबंध शोधत NCB ने अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची चौकशी केली. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच निधन झालं होतं. सुशांतच्या मृत्यूचं मुख्य कारण ड्रग्जचा ओव्हरडोस असल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले. तेव्हापासून NCB बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंध शोधण्यामध्ये गुंतली होती. या प्रकरणासंबंधी NCB कडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात NCB ने सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Ria Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांच्यासह 33 जणांवर आरोप केले आहेत.

Coronavirus: ''या'' अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब कोरोना...

14 जून 2020  रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रेमधील राहत्या घरी मिळाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतचे वडील के के सिंह यांनी पटनामधून अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप करत पोलिस ठाण्यामध्ये FIR दाखल केला होता. यानंतर ऑगस्टमध्ये सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले होते. CBI च्या चौकशीमध्ये जेव्हा ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा या प्रकरणात NCB चादेखील तपास सुरु झाला.

दीपिका पदूकोणला कोरोनाची लागण

दरम्यान, सुशांत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली. रिया तब्बल एक महिना भायखळा तुरुंगात होती. मात्र, नंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन मिळाला आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अ‍ॅंगल सोमर आल्यानंतर NCB ने बॉलिवूडच्या अनेक बड्या कलांकारांची आत्तापर्यंत चौकशी केली आहे. यामध्ये सारा अली खान (Sara Ali Khan), दिपिका पदुकोन (Dipika Padukone), रकुलप्रित सिंग (Rakul Preet Singh) अशा अनेक अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या