सुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन

सुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन
Sushant Singh Rajput

मुंबई: Sushant Singh Rajput Case दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत(Sushant Singh Rajput) याचे निधन 14 जून रोजी येत्या दोन दिसवात त्याला जावून एक वर्ष पूर्ण होइल. मात्र या अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी अद्याप सुरू आहे. नुकतेच या प्रकरणात कारवाई करत एनसीबीने ड्रग्स प्रकरणात सुशांतसिंग राजपूतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. सिद्धार्थ 26 मेपासून तुरूंगात आहे. अशा परिस्थितीत आता सिद्धार्थ पिठानी यांनी जामीन मागितला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुशांतसिंग राजपूतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने जामीन मागितला आहे. सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

सिद्धार्थ पिथानी ने दाखल केलेल्या जामीन अर्जात असे म्हटले आहे की, दिवंगत अभिनेत्याच्या रूममेटचे लग्न हैदराबादमध्ये 26 जून रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत त्याने लग्नाच्या आमंत्रणाची प्रत न्यायालयात सादर केली आहे. अशा परिस्थितीत सिद्धार्थने लग्नाच्या कारणासाठी जामिन अर्ज केला आहे. सिद्धार्थला जामीन मिळतो की नाही हे आता पहावं लागणार आहे. अलीकडेच सिद्धार्थची सगाई झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

सिद्धार्थ पिठानी केला खुलासा
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीला विचारणा करताना सिद्धार्थने अभिनेता सुशांतशी संबंधित इतर काही लोकांची नावे घेतली आहेत. सिद्धार्थने अशी अनेक नावे घेतली आहेत, ज्यांची आता एनसीबीमार्फत चौकशी केली जाऊ शकते. अशी माहिती आहे की सिद्धार्थने सॅम्युएलचे नाव घेतले आहे, सॅमुवेल हा सुशांतच्या घराचा मॅनेजर होता.

सॅमुवेलच्या अगोदरच एनसीबीने त्याच्यावर चौकशी केली आहे. पण आता सिद्धार्थच्या विधानाच्या आधारे त्याची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. मात्र, अद्याप सॅमुवेलला चौकशीसाठी बोलावले नाही. तर सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर नीरज, केशव आणि सुशांत यांच्या अंगरक्षकांवरही चौकशी करण्यात आली आहे.

महत्त्वाचा साक्षीदार आहे सिद्धार्थ पिठणी

सुशांत प्रकरणातील सिद्धार्थ पिठणी हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे कारण सिद्धार्थ हा पहिला व्यक्ती आहे ज्याने सुशांतला त्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा खोलीत पाहिलं होतं, त्याने सांगितले होते की अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. या विधानावर सिद्धार्थवर यापूर्वीही चौकशी केली गेली आहे. त्यावेळी सिद्धार्थने सुशांतच्या हार्ड डिस्क ब्रेक झाल्याबद्दल सांगितले होते.
सुशांतसिंग राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणात विविध प्रकारचे खुलासे केले जात आहेत. परंतु, अद्यापपर्यंत एनसीबी आणि सीबीआयच्या तपास यंत्रणेच्या खटल्याचा निकाल लागलेला नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com