सुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप

 सुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी  छाप
sushant singh rajput.jpg

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death anniversary of SSR) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे . सुशांतसिंग राजपूत यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. गेल्या वर्षी 14 जूनला सुशांत ने त्याच्या खोलीत आत्महत्या केली होती.  आजही त्याचे कुटुंब, चाहते आणि फिल्म इंडस्ट्री (Film industry) त्याला विसरलेले नाहीत. आजही प्रत्येकजण सुशांतला  न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सुशांतच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. आम्ही एक महान अभिनेता गमावला आहे अशाप्रकारच्या प्रतिक्रिया सिनेसृष्टीतील कलाकारांकडून  येत आहेत. सुशांतच्या  पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Sushant Singh Rajput death anniversary) त्याचे  स्मरण करून आम्ही तुम्हाला त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगू या. ज्याने इंडस्ट्रीत एक वेगळी छाप सोडली आहे.(Sushant's 5 films have made a different impression on Bollywood)

1- काई पो चे 

सुशांत सिंग राजपूतचा  हा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये त्याने ईशानची भूमिका साकारली होती. या चित्रपटाद्वारे सुशांतला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार (Best Male Debut Award) देखील  देण्यात आला होता . या चित्रपटामुळे तो काही वेळातच सुपरस्टार बनला. हा चित्रपट चेतन भगत यांच्या ‘3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या कादंबरीवर आधारित होता. स्टारडम मिळविण्यात या चित्रपटाने सुशांतला खूप मदत केली होती .

2-एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी

सुशांतसिंग राजपूतला  एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी कडून प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले असून सुशांतसिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती . या चित्रपटात सुशांतबरोबर दिशा पटानी, कियारा अडवाणी आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट 2016 च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता.

3-छिछोरे

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतने अनिरुद्ध पाठकची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सुशांत सोबत श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रितीक बब्बर, ताहिरसिंग भसीन, नवीन पॉलिशेट्टी, तुषार पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा एका मुलावर आधारित आहे जो आयआयटीमध्ये न आल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटातील सुशांतची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

4-सोनचिड़िया

सोनचिड़िया या सिनेमामध्ये  सुशांतसिंग राजपूतने जबरदस्त भूमिका केली होती .त्याच्या या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंद दिली होती . तो चित्रपट अभिषेक चौबे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला  होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 01.20 कोटींची कमाई केली होती. चित्रपटात सुशांतसिंग राजपूत सोबत  भूमी पेडणेकर, मनोज बाजपेयी, रणवीर शोरे, आशुतोष राणा हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. 'सोनचिड़िया' चित्रपटाची कथा 1975 च्या डाकोटांच्या कथेवर आधारित आहे.

5-दिल बेचारा

दिल बेचार हा सिनेमा  सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. यात सुशांतसह संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. सुशांतच्या निधनानंतर हा हॉटस्टारवर रिलीज झाला होता, या सिनेमाला  प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता .

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com