सुष्मिता सेनचा भाऊ घेणार घटस्फोट ? मुलीच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा?

sushmita sen Brother: सुष्मिता सेनचा भाऊ राजीव आणि पत्नी चारु असोपा घटस्फोट घेणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.
सुष्मिता सेनचा भाऊ घेणार घटस्फोट ? मुलीच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा?
sushmita sen BrotheDainik Gomantak

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने (Rajeev Sen) 2019 मध्ये अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) शी लग्नगाठ बांधली होती. अगदी थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आता राजीव-चारु लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चां समोर आल्या आहे. दोघांनी हा निर्णय का घेतला? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण दोघं लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. (sushmita sen Brother latest News)

‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘मेरे अंगने में’ या हिंदी मालिकांमुळे चारुला प्रसिध्दी मिळाली. तिने राजीवशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. पण आता दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहीतीनुसार चारु आणि राजीवमध्ये सध्या वाद सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद देखिल होत आहेत. शिवाय वाद बाजूला करत आपलं नातं टिकवण्याचा चारु-राजीवने प्रयत्न केला.

sushmita sen Brothe
Vikrant Rona Trailer: कीचा सुदीपच्या 'विक्रांत रोना' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स कायम

पण प्रत्यक्षात असे काहीच घडलं नाही. इतकंच नव्हे तर दोन्ही कुटुंबियांनी चारु-राजीवमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्न अपयश ठरला आहे. दोघांनी बहुदा कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सेन कुटुंबियांना देखील त्यांचा हा निर्णय ऐकून धक्का बसला आहे.

चारु-राजीवला सात महिन्यांची झियाना नावाची मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील या दोघांमध्ये वाद हे सुरुच राहिले. इंन्स्टाग्रमावर (Instagram) चारु राजीवला फॉलो देखील करत नाही. इतकंच नव्हे तर तिने राजीवबरोबरचे फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com