Lalit Modi सोबतच्या नात्याची घोषणा झाल्यानंतर Sushmita Sen ला चाहत्यांने पाठवली ही खास भेट

सुष्मिता सेन महिनाभर प्रवास करून घरी परतली आहे.
Sushmita Sen
Sushmita SenInstagram

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर चर्चेचा भाग बनली आहे. नुकतेच तिने ललित मोदींसोबतचे नाते जाहीर केले. त्यानंतर ती चर्चेचा भाग बनली. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यानंतर सुष्मिता ट्रोल झाली आहे. त्याचवेळी अनेक लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले. आता प्रवास केल्यानंतर सुष्मिता घरी परतली आहे. घरी आल्यावर सुष्मिताला खूप भेटवस्तू मिळाल्या आहेत. ज्या मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आहे. चाहत्यांच्या या भेटीचा फोटो सुष्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुष्मिता सेन दीर्घ सुट्टीनंतर मायदेशी परतली आहे. घरी आल्यावर तिला चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळाले. तिने तिच्या एका चाहत्याची नोट शेअर केली आहे. यासोबतच सर्वांचे आभार मानले आहे.

* चाहत्यांनी गिफ्ट पाठवले
सुष्मिताने चिठ्ठीचा फोटो शेअर केला आणि लिहिले- 'मी जवळपास महिनाभर प्रवास करून घरी आले आहे. घरी आल्यावर मला जगभरातील हितचिंतकांकडून भेटवस्तू आणि नोट्स मिळाल्या आहेत. मी तुम्हाला सर्व सांगू इच्छिते चांगुलपणा अस्तित्त्वात आहे हे मला नेहमीच माहित होते. माझ तुमच्यावर प्रेम आहे मित्रानो.'

सुष्मिताने तिच्या लिव्हिंग रूमचा एक फोटो शेअर केला आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे- 'प्रिय सुष्मिता सेन मॅडम, जेव्हाही मला हसावे लागते तेव्हा मला माहित आहे की काय करावे. मी फक्त डोळे बंद करून तुझ्याबद्दल विचार करते. फक्त तुझ्याबद्दल विचार करून माझ्या चेहऱ्यावर एक मोठं हसू येतं.

ललित मोदींसोबतच्या नात्याची घोषणा केल्यानंतर सुष्मिताला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर तिने एक पोस्ट शेअर करून तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com