'द डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्री 'आर्या बॅनर्जी'चा संशयास्पद मृत्यू

PTI
रविवार, 13 डिसेंबर 2020

 द डर्टी पिक्चरसह अनेक बॉलिवूडपटात काम करणारी नायिका आर्या बॅनर्जी (वय ३३) ही परवा तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडली.

कोलकता :   द डर्टी पिक्चरसह अनेक बॉलिवूडपटात काम करणारी नायिका आर्या बॅनर्जी (वय ३३) ही परवा तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडली. दक्षिण कोलकता येथील एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर ती एकटीच राहत होती. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना आर्याच्या नाकातून रक्त आल्याचे पुरावे आढळून आलेआहेत. आर्या बॅनर्जी ही घरातच एका पाळीव कुत्र्यासमवेत राहत होती. तिची बहिण सिंगापूरला असते. मृत अभिनेत्रीच्या घरातून दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. आर्या बॅनर्जी ही दिवंगत सितारवादक निखील बंदोपाध्याय यांची कन्या होती.

 

अधिक वाचा :

रजनीकांत...कडेपठार ते चेन्नई व्हया बंगळूर

संबंधित बातम्या