टॉलिवूडची टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू
Pratyusha GarimelaDainik Gomantak

टॉलिवूडची टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू

प्रत्युषा डिप्रेशनने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती

टॉलिवूडची टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेला यांचे निधन झाले असल्याचं स्पष्ट झालं आहे. तेलंगणातील बंजारा हिल्स येथील तीच्या घरी मृतदेह आढळला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचं पोलीसांनी सांगितले असुन याबाबक अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रत्युषाने आपल्या करियरची सुरुवात करताना अमेरिकेतून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले होते. यानंतर प्रत्युषाने हैदराबादमध्ये फॅशन डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिने टॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत ही काम केले आहे. (Suspicious death of Tollywood's top fashion designer Pratyusha Garimela )

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाचा मृतदेह हा तीच्या बंजारा हिल्स येथील घरी आढळला आहे. तसेच 35 वर्षीय प्रत्युषा गरिमेलाच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड सिलिंडर जप्त करण्यात आला आहे. तर हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार, प्रत्युषाने मृत्यूपूर्वी कार्बन मोनोऑक्साइड श्वास घेतला होता. प्रत्युषा डिप्रेशनने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Pratyusha Garimela
लता मंगेशकर यांचे पहिले गाणे कधीच झाले नाही रिलीज; जाणुन घ्या कारण

प्रत्युषाच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सुरक्षा रक्षकाला प्रत्युषाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना प्रत्युषाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तीच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना याची माहिती दिली.

Pratyusha Garimela
आमिर खानसमोर एका वादग्रस्त वकिलाच्या बायोपिकची ऑफर

बंजारा पोलिसांनी याबाबत सांगितले की, प्रत्युषाच्या खोलीतून एक चिठ्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी कोणावरही आरोप केलेला नाही. नोटमध्ये लिहिले की, "मला खूप एकटेपणा आणि नैराश्य वाटत आहे." तिने आत्महत्या केल्याचे समजते. मात्र, अद्याप काहीही पुष्टी झालेली नाही आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रत्युषाने अमेरिकेतून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. यानंतर प्रत्युषाने हैदराबादमध्ये फॅशन डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली. प्रत्युषाने 2013 मध्ये स्वतःच्या नावाने एक लेबलही सुरू केले होते. यानंतर प्रत्युषा खूप लोकप्रिय फॅशन डिझायनर बनली. तिने टॉलिवूड आणि काही मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही काम केले. यामध्ये माधुरी दीक्षित, रवीना टंडन, काजोल, परिणीती चोप्रा, हुमा कुरेशी, श्रिया सरन, काजल अग्रवाल, जुही चावला, गौहर खान, नेहा धुपिया, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com