सुझैन खान म्हणते..." हृतिक आहे 'बेस्ट फादर इन द वर्ल्ड' "

वृत्तसंस्था
रविवार, 10 जानेवारी 2021

फक्त भारतच नव्हे तर जगभरात डान्सिंग सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस.

मुंबई :  फक्त भारतच नव्हे तर जगभरात डान्सिंग सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस. सोशल मिडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. परंतु, एका खास व्यक्तीने हृतिकला 'बेस्ट फादर इन द वर्ल्ड' म्हणत अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

 

सुझैनने एक खास व्हिडीओ शेअर करत हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सुझैन खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओ हृतिक आणि त्याच्या दोन्ही मुलांचा आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रेय. तुझ्या आयुष्यात नेहमी सुखाचे,आनंदाचे दिवस येवोत आणि २०२१ हे वर्ष खूप चांगलं जावो ”, अशा आशयाचं कॅप्शन  दिलं आहे. सुझानने व्हिडीओला बेस्ट डॅड इन द वर्ल्ड’ असा हॅशटॅग दिला आहे. हृतिक आणि सुझैनने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधली मैत्री कायम राहिली आहे. 

संबंधित बातम्या