स्वरा भास्कर राहुल गाधींचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

राहुल गांधींना उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्य़ांपैंकी एका विद्य़ार्थ्यांने प्रश्न विचारण्यासाठी त्यांना सर म्हणून हाक मारली होती.

मे महिन्यात पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी पुदुचेरीमध्ये पोहचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी पुदुचेरीमधील कॉलेजच्या मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. याच दरम्यान राहुल गांधींना उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्य़ांपैंकी एका विद्य़ार्थ्यांने प्रश्न विचारण्यासाठी त्यांना सर म्हणून हाक मारली होती. मात्र लगेच राहुल गांधींनी त्या विद्यर्थ्याला 'माझे नाव सर नाही' असं म्हणत उपस्थितांचे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचा हा व्हिडीओ प्रसिध्द अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी शेअर केला आहे.

पुदुचेरीमधील कॉलेजच्य़ा विद्य़ार्थ्याने राहुल गांधी यांना सर म्हणून आवाज दिला असता त्यांनी 'मला सर म्हणू नका' तुमच्या सरांना तुम्ही सर म्हणा. माझे नाव राहुल आहे, आणि राहुल म्हणूनच आवाज द्या. त्यांचे हे उत्तर एकून विद्यार्थी खूप आनंदी झाले.

अभिनेता आर माधवन चा डी लिट पदवी देवून सन्मान

त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमात तूफान व्हायरल होत आहे. आणि या व्हिडीओला अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर रिट्विट करत स्वीट म्हटले आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. देशातील अनेक सामाजिक, राजकिय विषयावर ती भाष्य करत असते. सध्या सुरु असणाऱ्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर जमलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्य़ा पाठिंबा असेल, तसेच जवाहरलाल नेहरु विद्य़ापीठात झालेल्या हिंसाचाराला विरोध असेल अशा अनेक मुद्दयांवर स्वराने आपली परखडपणे मते मांडली आहेत. 

संबंधित बातम्या